+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustबापट कॅम्पमधील मूर्तिकारांना मार्केट यार्डात निवारा शेड उपलब्ध करा : सतेज पाटील यांच्या सूचना; पूरग्रस्त भागाची केली पाहणी adjustकाँग्रेसच्या समन्वय समितीत आमदार सतेज पाटील adjustबनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी - राज्यपाल रमेश बैस adjustराज्यपालांच्या उपस्थितीत कारगिल विजय दिवस रजत जयंती समारोह साजरा adjust'‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस adjustघाबरुन न जाता वेळेत स्थलांतरीत होवून प्रशासनाला सहकार्य करा; शासन आपल्या पाठीशी; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला पूरग्रस्तांना धीर adjustकोल्हापुरातील पंचगंगा तालीम, सुतारवाडा, सीता कॉलनी, शाहूपुरी, बापट कॅम्प परिसराती 228 नागरीकांचे स्थलांतर adjustकारगिल ऑपरेशन विजय भारतीय जवानांच्या शौर्याचे प्रतीक : कॅप्टन डॉ. अमित रेडेकर; के.एम.सी. कॉलेज व गोखले कॉलेज यांच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा adjustडीकेटीईच्या १४ टेक्स्टाईल विद्यार्थ्यांची रिड अँण्ड टेलर कंपनीमध्ये निवड adjustबगॅसपासून वीज निर्मिती करणार्‍या साखर कारखान्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून अनुदान मिळावे, खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
1000867055
1000866789
schedule02 Apr 24 person by visibility 230 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौंसिल , शिवाजी विद्यापीठ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन (SUKRDF ), इंडियन इन्स्टिटयूट ऑफ केमिकल इंजिनीअर्स आणि इंडियन सोसायटी फॉर टेकनिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० मार्च रोजी TECHFEST 2K24 ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस चालना मिळावी तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील नवनिर्मितीचा सर्वसामान्य लोकांसाठी वापर व्हावा या भूमिकेला अनुसरून या स्पर्धेचे नियोजन केले होते. या वेळी लोकउपयोगी नवनिर्मित प्रकल्पांना बक्षीस व प्रमाणपत्रक देऊन गौरवण्यात आले व विद्यार्थांना नव संशोधन करण्यास प्रवृत्त व मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकल्प स्पर्धेमध्ये ऐकून ३१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.

 या प्रकल्प स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विज्ञान, तंत्रज्ञान व औद्योगिक क्षेत्रातील प्रगती संशोधनांवर अवलंबून असून,वायू प्रदूषण, इंधन तुटवडा, आधुनिक उत्पादनांची आयात अशा अनेक भविष्यातील मोठ्या समस्यांना शाश्वत संशोधनाद्वारे मात करता येते असे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी उद्योजक बनून संशोधनाच्या आधारे नवसुधारित उत्पादने, सेवा प्रक्रिया, डिजिटल तंत्रज्ञानांची निर्मिती करून समाजाला विकसित करावे असे आवाहनही यावेळी प्रो. डॉ. पी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

 वाहनांन पासून होणारे वायुप्रदूषण या जागतिक समस्येवर शाश्वत संशोधनाद्वारे मात करता येत असून संशोधनातुन नवनिर्मित उत्तम दर्जाची यंत्र निर्मिती करता येते. याचे सखोल मार्गदर्शन विभागाचे संचालक प्रो. डॉ. एस. एन. सपली यांनी यावेळी केले.

 औद्योगिक क्षेत्रामध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज असून अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून उद्योजक बनता येते याबद्दल मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, मयुरा स्टील प्रा. लिमिटेड कोल्हापूर चे मॅनेजिंग डायरेक्टर रवी डोली यांनी केले.
 या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. पी. एस. पाटील, अधिविभागाचे संचालक प्रो. डॉ. एस. एन. सपली, SCIIL, SUK चे संचालक डॉ. एस. डी. डेळेकर, स्पर्धेचे समन्वयक डॉ. डी. एम. नांगरे, ए. ए. डुम, श्री. ए. बी. मडावी तसेच अधिविभागाच्या सर्व शाखांचे समन्वयक, पी. ए. प्रभू, डॉ. आर. जे. देशमुख, डॉ. एस. बी. चव्हाण, डॉ. आय. एस. उडचन, एम. एस. साळुंखे, विभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

सदर प्रकल्प स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के प्र.कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ व्ही. एन शिंदे यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले आहे.   
   
🟠या प्रकल्प स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे 
मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातून:
प्रथम क्रमांक: श्रुती बावनकर व ग्रुप (VIT Pune )
द्वितीय क्रमांक: तेजस काकडे व ग्रुप (Department of Technology SUK)
तृतीय क्रमांक: स्वरूप घाटगे (Bharati Vidyapeeth Kolhapur) 
केमिकल इंजिनीरिंग विभागातून 
प्रथम क्रमांक: सौरभ नलुगडे, महांतेश कोरे (DY Patil College of Engineering Kolhapur), 
द्वितीय क्रमांक: पृथ्वी चिंतामणी व ग्रुप (KLE Dr. MS Sheshgiri COE and Tech. Belagavi)
तृतीय क्रमांक: आम्रपाली रणवीर व प्रतीक पाटील (Department of Technology SUK) 
 सिव्हिल इंजिनीरिंग विभागातून  
प्रथम क्रमांक: रोहित पारधे व ग्रुप (Pillai HOC College of Engineering Panvel)
द्वितीय क्रमांक: हृतिक रहाटनकर व ग्रुप (Department of Technology SUK) 
तृतीय क्रमांक: अनिश सहानी (Pillai HOC College of Engineering Panvel) 
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीरिंग विभागातून  
प्रथम क्रमांक: प्रथमेश शिंदे, हर्षाली देवांग (SMT Kashibai Navale COE Pune)
.द्वितीय क्रमांक: अफरान , अभिषेक व ग्रुप ( SG Balekundri COE Belagavi )... 
तृतीय क्रमांक: अभय वासंभेकर (Department of Technology SUK ) 
फूड टेकनॉलॉजि विभागातून  
प्रथम क्रमांक: चैताली केसकर व ग्रुप (Department of Technology SUK) 
द्वितीय क्रमांक: सृष्टी पाटील व ग्रुप (Department of Technology SUK) 
तृतीय क्रमांक: सुरभी शिंग व ग्रुप (Department of Technology SUK) यांनी मिळवला. 
कम्प्युटर इंजिनीरिंग विभागातून
प्रथम क्रमांक: रुचिता यादव व ग्रुप (J. J Magadum College of Engineering, Jaysingpur)
द्वितीय क्रमांक: अथर्व पाटील व ग्रुप (Annasaheb Dange College of Engineering, Ashta)  
तृतीय क्रमांक: अवधूत बागल (Government College of Engineering, Ratnagiri)