SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणारराधानगरी तालुक्यातील अवसायनात संस्थांच्या सुनावणीस गती द्या : अभिजीत तायशेटे, संचालक, गोकुळ दूध संघ कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी देऊ : मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेकोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’; ३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरणदीड वर्षांपासून रखडले काम; उचगाव-गडमुडशिंगी रस्त्यासाठी शिवसेना मैदानात!महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल; ९ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर; सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव आदी जिल्ह्याचा समावेश भारतीय हवाई दलाचे ‘फ्लाईट सिम्युलेटर’ बनले विद्यार्थ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू; केआयटी मध्ये भारतीय वायुदलाचा विशेष जनजागृती कार्यक्रमजागतिक कला व वारसा दिनानिमित्त विद्यापीठात ‘रंग कुंचल्याचे’ स्पर्धामहात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांच्या अनुबंधाविषयी शिवाजी विद्यापीठात गुरूवारी चर्चासत्रडी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये दोन दिवसीय हॅकॅत्सोवचे आयोजन

जाहिरात

 

​"६३ वर्षांची उज्ज्वल परंपरा अन् नवी झेप! गोकुळच्या वर्धापन दिनानिमित्त 'गोकुळ आईस्क्रीम' लाँच आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन"

schedule14 Mar 26 person by visibility 325 categoryउद्योग

कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आपल्या यशस्वी वाटचालीची ६३ वर्षे पूर्ण करीत आहे. या सुदिनाचे औचित्य साधून संघामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन दि.१५/०३/२०२६  रोजी गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले आहे. यामध्ये विविध फ्लेवर्समधील प्रिमियम क्वालिटीच्या ‘गोकुळ आईस्क्रीम’चा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच सन २०२४–२५ या वर्षातील ‘गोकुळ श्री’ पुरस्कार विजेत्यांचा गौरव सोहळा ही आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स्तरावर गाय व म्हैस यांचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्था, म्हशीचे जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे उत्पादक, म्हशीचे उत्तम प्रतीचे दूध पुरवठा करणारे उत्पादक तसेच गाय / म्हैस जास्तीत जास्त दूध पुरवठा करणाऱ्या महिला दूध संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. 

याशिवाय कोल्हापूर, पुणे व मुंबई येथे जास्तीत जास्त दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दूध वितरकांचाही सत्कार करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. या सर्वांचा समावेश असलेला बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडणार असून, गोकुळ दूध संघाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या दूध उत्पादक व वितरकांचा गौरव करण्याचा हा उपक्रम असल्याचे संघाकडून सांगण्यात आले. 

दैनंदीन दूध विकी बरोबरच सध्या गोकुळ टेट्रापॅक मधील दूध, पनीर, चीज, गुलाब जामून, श्रीखंड, तूप, टेबल बटर, फ्लेवर मिल्क, बासुंदी, पेढा इत्यादी दुग्धजन्य पदार्थ विक्री करत असून गोकुळच्या दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणांत बाजारातून मागणी होत आहे. गेल्या काही वर्षापासून गोकुळच्या वितरक वा ग्राहकांकडून ‘गोकुळचे आईस्क्रीम’ मार्केटमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे अश्या प्रकारची मागणी केली जात होती. त्याप्रमाणे गोकुळच्या तज्ञ अधिका-यांचे देखरेखीखाली आईस्क्रीम तयार करून घेतले आहे. सदरच्या आईस्क्रीममध्ये म्हैस दूध, स्किम मिल्क पावडर, म्हैस लोणी व गाय किस व नॅचरल फ्लेवर वापरणेत आले आहेत.

 गोकुळचे आईस्क्रीम हे कप पॅकींग, कोन पॅकींग, फॅमिली पॅक या व्हेरीयंटमध्ये उपलब्ध असून मँगो, नॅचरल व्हेनीला, बेल्जीयन चॉकलेट, बटर स्कॉच, हॅअलनट कन्च, बिसकोटी बिस्कॉफ व अफगाण ड्रायफ्रूट, राजभोग या फ्लेव्हर मध्ये उपलब्ध आहेत.

संघाचे फुलक्रीम व गाय दूधास ज्या प्रकारे मुंबई व पूणे येथे चांगली मागणी आहे. त्याप्रमाणेच गोकुळच्या आईस्क्रीमला देखील मुंबई व पूणे मार्केटमधून चांगला प्रतिसाद मिळेल याचा विश्वास यावेळी संचालक मंडळाने व्यक्त केला. 

गुढी पाडवा, रमजान ईद सणाच्या काळांत तसेच सध्या उन्हाळ्याचा सिझन असलेने गोकुळच्या ग्राहकांनी दूध व दुग्धजन्य पदार्था बरोबराच गोकुळचे आईस्क्रीमचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संघाचे चेअरमन  नविद मुश्रीफ यांनी केले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ व सार्वजनिक आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर आणि माजी गृहराज्य्मंत्री आमदार सतेज पाटील , आमदार विनय कोरे , आमदार चंद्रदीप नरके यांच्या तसेच जिल्ह्यातील आमदार व मान्यवर व चेअरमन नविद मुश्रीफ, संचालक मंडळ यांच्या उपस्थित होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes