शिवाजी विद्यापीठात मंथली इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन
schedule11 Oct 24 person by visibility 247 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या 'शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंदाच्या' माध्यमातून कृतिशील व नवसंकल्पनांना मूर्तरूप देण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थी, संशोधक व नागरिकांना रोजच्या आयुष्यात उध्दभवणा-या विविध समस्यावर नाविन्यपूर्ण उत्तरे व समाधान सुचविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.'मंथली इनोव्हेशन चॅलेंज' या माध्यमातून वर्षभर जिज्ञासूंना विविध प्रश्न शोधण्याकरीता व त्यावर सर्जनशील उत्तरे सुचविण्याकरीता व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली आहे.
यामध्ये प्रत्येक महिन्याला एक विषय दिला जाईल. यावर विद्यार्थी शिक्षक तसेच नागरीक त्या संदर्भातील त्यांनी शोधलेले प्रश्न तसेच त्यावर त्यांनी शोधलेला कल्पक पर्याय अथवा उत्तर/समाधान याची माहिती भरू शकतात, याकरिता गुगल फॉर्म च्या माध्यमातून एक लिंक तयार केलेली असून ही लिंक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेली आहे. ¼होम पेज → न्यूज अँड इव्हेंटस् → मंथली इनोव्हेशन चॅलेंज . ऑक्टोबर 2024) विद्यापीठाच्या वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यात नवसंशोधन व कृतिशील समस्या समाधान याकरीता नक्कीच चालना मिळणार आहे. या महिन्यातील उपक्रमाकरिता जिज्ञासूंना इनोव्हेशन आणि सस्टेनेबेलिटी डेव्हलपमेंट हे क्षेत्र दिलेले आहे.
सस्टेनेबेलिटीए एडटेक आणि ॲग्रीटेक, हेल्थटेक, इमर्जिंगटेक, स्मार्टटेक, मोबिलिटी, गर्व्हनमेंट टेक, मिस्सेलिनिअस उपक्रमांमध्ये भेडसावणा-या समस्या व त्यावरील कल्पक उत्तरे अपेक्षित आहेत. यातील सहभागींना या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या समोर सादरीकरणाची संधी मिळणार असून या क्षेत्राशी संबंधित शोधलेल्या प्रश्नांना योग्य बक्षीस तसेच त्यावरील सर्वोत्तम व नवीन सर्जनशील उत्तरांना विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्रामार्फत स्टार्टअप म्हणून समाविष्ट होण्याचीदेखील संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठ नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य केंद्राचे संचालक प्रा. डॉ. एस. डी. डेळेकर यांनी दिली आहे. यासंदर्भातील सर्व माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.