पद्मश्री डॉ. ग. गो जाधव यांना विद्यापीठात अभिवादन
schedule20 May 26 person by visibility 100 categoryसामाजिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पद्मश्री. डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र- कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात हा कार्यक्रम झाला.
यावेळी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील, अनुप जत्राटकर, अभिषेक पाटील, सूरज पुरी, उद्देश पाटील, सानिका भोरे, प्रवीण पांढरे, जान्हवी लायकर, साईप्रसाद आडके, सुप्रिया टाकळकर, सुप्रिया भोसले मयूर कांबळे आदी उपस्थित होते.