SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पोस्टल मतदानाद्वारे आज 442 मतदानस्वयंसेवी संस्थांनी आपल्या कक्षा विस्तारल्या पाहिजेत ; डॉ. महेश ठाकूर यांचे प्रतिपादन मतदार जनजागृतीसाठी ''मतदान दौड'' संपन्नजाहिरात परवानगीसाठी सोमवार दुपारपर्यंतच मुदत; प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदीप्रभागाच्या सर्वांगीण संतुलित विकासाचे ध्येय बाळगणाऱ्या ओंकार जाधव यांना मतदारांचा उस्फूर्त प्रतिसाद; महिलांची प्रचार फेरीकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 : आलिय नासिर गोलंदाज यांची प्रचारामध्ये आघाडी; मतदारांचा वाढता प्रतिसादसत्यजित जाधव, महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात गती; मतदारांकडून वाढता प्रतिसादआरटीई 25 टक्के ऑनलाईन विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतंर्गत शाळा नोंदणी सुरुपदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी 12 जानेवाला प्रसिध्दअभ्यास दौऱ्यानिमित्त इस्रोकडे जिल्ह्यातील 72 विद्यार्थी रवानानाविन्यपूर्ण योजनेतून राज्यातील पहिलाच उपक्रम

जाहिरात

 

डेक्कन स्पोर्ट्स क्लब आजोजित "पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन"; १५०० पेक्षा जास्त स्पर्धक धावले

schedule28 Aug 22 person by visibility 1303 categoryक्रीडा

कोल्हापूर : कोल्हापुर या करवीर नगरीतील ऐतिहासिक पन्हाळा या ठिकाणी कोल्हापूरकरांसाठी देश विदेशातील स्पर्धकांसाठी डेक्कन स्पोर्ट्स क्लब व शांतिनिकेतन स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित "पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन" ही स्पर्धा आज २८ ऑगस्ट २०२२ रोजी पन्हाळा येथे पार पडली. देश विदेशातील एकूण १५०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग हा नोंदविला होता. शिवाय या मॅरेथॉनमध्ये २५ शासकीय अधिकारीही सहभागी झाले होते.२१ किलोमीटरमध्ये १८ ते ३० वयोगटमध्ये ऋषिकेश पाटील याने बाजी मारली.व तो सर्वात पहिला आला आहे.

दिल्ली,लातूर,सोलापूर,हुबळी,धारवाड,बेळगाव, नाशिक, सांगली, विटा अशा विविध ठिकाणच्या स्पर्धक या पन्हाळ गडावर स्पर्धेसाठी आले होते.

"पन्हाळा हा ऐतिहासिक गड जपा व त्याचे पावित्र्य राखा"असा संदेश मॅरेथॉन मधून दिला गेला.स्पर्धा रात्री ३ वाजता सुरू झाल्या.स्पर्धेचे उदघाटन मधुरीमाराजे छत्रपती, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, शाहूवाडीचे डी.वाय.एस. पी रवींद्र साळोखे, पन्हाळा पी.आय अरविंद माने, डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे व्हाईस चान्सलर राकेश मुदगल,पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष रवींद्र धडेल यांच्या हस्ते झाले. ही मॅरेथॉन २१,११ व ५ किलोमीटर अंतराची होती.  

स्पर्धेचा निकाल असा

५ किलोमीटरमध्ये : १२ ते १५ वयोगटात (पुरुष)१)गुरुप्रसाद विनोद मोरे, २)पियुष व्ही.सूर्यवंशी,३) अमोल व्ही. पाटील (महिला) मध्ये १)देविका प्रवीण देसाई,२) भक्ती अमित वसाटकर,३)तनीष्का तानाजी बाबर यांनी पारितोषिक पटकावले आहे.१६ ते ३० वयोगट (पुरुष) १)गणेश भाऊसो पाटील,२) अर्केश गजानन सुतार,३) यासीन मेहबूब देसाई (महिलांमध्ये) १) अक्षया पवार,२) मिताली अण्णासाहेब स्वामी,३)जुई संजय क्षीरसागर आणि ३१ ते ४५ वयोगटात (पुरुष) १)बबन डी. लांबोरे,२) शिवकुमार छानबसप्पा,३) प्रदीप के. जठार (महिला) ग्रुप मध्ये १)चित्रा रमेश सापळे,२) शुभांगी के.कुसाळे,३) स्नेहलता कृष्णात पवार. ४६ पुढे (पुरुष) वयोगटात १)नितीन बंडोपंत जाधव,२) जयंत भोपळे,३) अर्जुन यशवंत वदराळे, महिलांमध्ये १) मनीषा पाटील.


११ किलोमीटर : १६ ते ३० वयोगट (पुरुष) १)पंकज रावळू,२) राजवर्धन सचिन घाडगे,३) गौरव दादासाहेब धायगुडे (महिल१) राधा कौसाधीकर२) साक्षी कुसाळे,३) सारा शिवराज जाधव, ३१ ते ४० वयोगटात (पुरुष) १)निलभ गोयंका,२)अश्किन आजरेकर,३) किरण अनंत पावेकर, (महिला) गटात १)डॉक्टर प्रविणा सुधीर गिरी, २)शुभांगी पाटील,३) अनुराधा अमित बोकील, ४१ ते ५० वयोगटात (पुरुष) १)संभाजी काळे,२)अमोल चीवेलकर,३)रेहमान शेख, (महिलांमध्ये) १) अंजली अजय कुलकर्णी,२) प्रांजली अमर धामणे,३) माधुरी गुजर ५१ वयोगट पुढे (पुरुष)१) दिलीप जाधव,२) राजकुमार अण्णासाहेब चाचावाले, ३)राजन नायकु कुंभार, (महिलांमध्ये)१) डॉक्टर सरोज शिंदे,२) गीता शेटे,३) डॉक्टर.सुमित कुलकर्णी.

२१ किलोमीट : १८ ते ३० वयोगट (पुरुष)१) ऋषिकेश पाटील,२) ओमकार कैलास जोकर,३) निलेश शेळके,३१ ते ४० वयोगट (पुरुष)१)राहुल साहेबराव शिरसाट,२)सुरेश ज्ञानदेव चेचर,३) अजित निकम, ३१ ते ४० वयोगट (महिला)१) डॉक्टर मनल अनथिकट,४)दिपाली अंकुश किरदात,३)अर्चना हिंदुराव पाटील, ४१ ते ५० वयोगट (पुरुष)१)जयंत अरविंद शिंदे,२) सचिन प्रकाश डाकरे,३) सुधाकर सुरेश सोनवणे, (महिलांमध्ये)१) डॉक्टर पल्लवी मोग, २)डॉक्टर शिल्पा दाते,३) दीपा प्रशांत तेंडुलकर. आणि ५२ वर्षापुढे (पुरुष)१) अरविंद सावंत,२)अतुल कमलाकर,३) अजित एस कांबोज, (महिलांमध्ये) १)विद्या बेंदळे आदींनी पारितोषिक पटकावले आहेत.

या सर्व विजेत्या स्पर्धकांना जाईन्ट रजिस्ट्रार काकडे, डी.डी.आर अमर शिंदे, इरीगेशनचे सुप्रीटेंडंट इंजिनियर महेश सुर्वे,कोल्हापूर शहर डीवायएसपी मंगेश चव्हाण, सिनियर पी.आय तानाजी सावंत ,पी. आय ईश्वर उमासे, पन्हाळा पी.आय श्री काळे, केडीएमजीए पदाधिकारी, क्रीडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे बापू कोंडेकर, प्रजासत्ताक दिलीप देसाई यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व मेडल देण्यात आली.यावेळी उपस्थित सर्व मान्यवर मॅरेथॉनमध्ये धावले.


आरोग्य कॅम्प : डॉ. डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी व मेडिकल कॉलेजचे फिजिओथेरपी चे ४० लोकांची टीम कार्यरत होती.त्यांनी मार्गदर्शन केले.व डॉ. प्रांजल धामणे यांच्या टीमने नेहमीप्रमाणे सेवा दिली.

पन्हाळा हिल हाफ मॅरेथॉन ही ५ किलोमीटर १३ वर्षापुढील, ११ किलोमीटरची मॅरेथॉन ही १६ वर्षांपासून पुढील वय आणि २१ किलोमीटरची मॅरेथॉन ही १८ वर्षांपासून पुढील सर्व वयोगटासाठी होती. सहभाग सर्व स्पर्धकांना गुडी बॅग,टी. शर्ट, फीनीशर मेडल,टाईम चिप (११ किलोमीटर व २१.१ किलोमीटर स्पर्धकांसाठी )ई - सर्टिफिकेट नाश्ता आदी दिले गेले.
या स्पर्धेसाठी एकूण ७५ व्हॅालेंटीयर्स मॅरेथॉन मार्गावर कार्यरत होते.डेक्कन स्पोर्ट्स क्लबचे,उदय पाटील,वैभव बेळगावकर,राजीव लिंग्रस,अभिषेक मोहिते,जयेश कदम,समीर नागटिळक,अश्कीन आजरेकर,अमर धामणे,अतुल पोवार,मनीष सूर्यवंशी,संजय चव्हाण,वैभव बेळगावकर,उदय पाटील ,समीर चौगुले,अँड.अनुजा मेहेंदळे,समीर चौगुले,प्रशांत काटे आदी पदाधिकारी यांनी स्पर्धेचे संयोजन केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes