+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustअटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत adjustयेत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे adjustकाश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण adjustनियमित योग साधनेतून वैश्विक ऊर्जा प्राप्त : कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के adjustअन्न प्रक्रिया उद्योगातील नोंदणीकृत वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रशिक्षण adjustसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात adjustकोल्हापूर महानगरपालिका : 6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु adjustशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त के.एम.टी. उपक्रमामार्फत "ऐतिहासिक वास्तू दर्शन" सहलीसाठी विशेष बससेवा adjustचप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु; 'आप'च्या मध्यस्तीस यश adjustशिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री जाधव; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली सूचना
SMP_news_Gokul_ghee
schedule20 May 24 person by visibility 865 categoryगुन्हे
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राजारामपुरी येथील डॉ.चंद्रशेखर पाटील यांचे साई कार्डीयाक सेंटर हॉस्पीटलने जैव वैद्यकीय कचरा ॲटो टिप्परमध्ये टाकल्याने त्यांना नोटीस देऊन रु.5000/- दंड करण्यात आला आहे. महापालिकेच्या घरगुती कचरा संकलन करणा-या ॲटो टिप्परमध्ये बेकादेशीरित्या हा जैव वैद्यकीय कचरा त्यांनी टाकल्याने हा दंड करण्यात आला आहे. ही कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांचे आदेशानुसार आरोग्य निरिक्षकांनी केली आहे.

  तसेच राजरामपुरी येथील मोरया हॉस्पीटल, जानकी हॉस्पीटल व स्टार हॉस्पीटलने रस्त्यावर व कोंडाळयाच्या ठिकाणी घातक जैव वैद्यकीय कचरा टाकलेने त्यांच्या आस्थापनांना नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 च्या तरतुदीनुसार देण्यात आली आहे. या तरतुदीनुसार या सर्वांना प्रत्येकी रु.5,000/- दंड करण्यात येणार आहे.

 त्याचबरोबर आज शास्त्री नगर येथील ॲस्टर आधार हॉस्पीटलच्या येथे सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांना पाहणी करताना त्यांच्या कच-यामध्ये बायो मेडिकल वेस्ट आढळून आले आहे. त्यांनाही आज नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सहा.आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिले आहेत.

 सदरची दंडात्मक कारवाई भागातील आरोग्य निरिक्षक ऋषीकेश सरनाईक, मुनीर फरास, श्रीराज होळकर यांनी केली आहे.