केआयटीच्या संगणक विभागाच्या ८ विद्यार्थीनींची परसिस्टन्ट सिस्टिम्स कंपनी मध्ये निवड; सर्व जागांवर विद्यार्थीनींनी मारली बाजी
schedule12 Jun 24 person by visibility 988 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाच्या ८ विद्यार्थिनींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्सिस्टंट सिस्टीम या कंपनीमध्ये निवड झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थीनींमध्ये वैष्णवी पवार, सिंधुजा कार्जिंनी, स्नेहा खाडे, स्नेहल भोसले, संजीवनी आपटे, श्वेता ठाकूर, स्नेहल चोरडे, सलोनी भोसले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या निवड प्रक्रियेत अप्टिट्यूड टेस्ट,तांत्रिक मुलाखत, वैयक्तिक मुलाखत या आधारे अंतिम यादी मध्ये या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.निवडलेल्या विद्यार्थ्यांना ५ लाखाचे वार्षिक पॅकेज कंपनीने जाहीर केले आहे. प्रत्येक सुट्टीत अभ्यासाव्यतिरिक्त संगणक विभागाने वेळोवेळी मुलाखतीचे सराव, प्रात्यक्षिक करून घेतले व सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले. सातत्याने घेतलेल्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला व वैयक्तिक प्रभावमूल्य वाढल्याचे मनोगत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयातील ट्रेनिंग प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ.आमित सरकार, संगणक विभाग प्रमुख डॉ.लिंगराज हादिमनी, संगणक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा.चैतन्य पेडणेकर व प्रा.उदय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
केआयटीचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चौगुले,संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, रजिस्ट्रार डॉ. एम. एम. मुजुमदार यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले आहे.