SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी; आज 1 डिसेंबरला रात्री 10 वाजता प्रचाराची सांगता चला करूया हद्दपार - एड्सलागडहिंग्लज नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारार्थ आमदार डॉ.विनय कोरे यांनी मतदारांशी साधला संवाद भाजप सरकारने महिलांना स्वावलंबी करून सक्षम बनवले : खासदार धनंजय महाडिक हातकणंगलेच्या प्रलंबित विकासकामांना करोडो रुपयांचा निधी देण्यासाठी हातकणंगले नगरपंचायतीमध्ये कमळ फुलवा : चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन‘ब्राह्मण बिझनेस फोरम’च्या वतीने ‘ब्रह्मउर्जा २०२५’ पुरस्कार वितरण उत्साहात !डॉ. अमृतकुवर रायजादे यांना ‘वूमन ऑफ पॅशन’ पुरस्कारडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोघांना खेलो इंडियामध्ये कास्यपदकमहाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा ५ डिसेंबर ला राज्यव्यापी व्यापार बंद; उद्या १ डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हास्तरीय व्यापारी परिषदेचे आयोजनकेआयटी च्या वतीने स्टार्टअप उद्यमींसाठी ‘आस्क मी एनीथिंग’ चे आयोजन; केआयटीच्या आय.आर.एफ चा पुढाकार

जाहिरात

 

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी; आज 1 डिसेंबरला रात्री 10 वाजता प्रचाराची सांगता

schedule01 Dec 25 person by visibility 46 category

मुंबई : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमांतदेखील जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता संपेल. त्यानंतर प्रचारसभा, प्रचारफेऱ्या, ध्वनिक्षेपक इत्यादींसह अन्य प्रकारे जाहीर प्रचार करता येणार नाही. 

राज्य निवडणूक आयोगाने 9 ऑक्टोबर 2025 रोजी ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रामाणन आदेश, 2025’ प्रसिद्ध केला आहे. या आदेशाच्या भाग आठमधील परिच्छेद 16 अन्वये नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीच्या प्रचार समाप्तीनंतर आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे किंवा समाज माध्यमांमध्ये कुठल्याच प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाहीत, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes