प्रयत्नांच्या जोरावर यशाचे शिखर गाठा : माजी प्राचार्य विजय डोणे
schedule28 Dec 25 person by visibility 50 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : कष्ट,मेहनत, चिकाटी,सातत्य,जिद्द या पंचसूत्रीच्या जोरावर यश संपादन करा. तसेच मेन राजाराम हायस्कूल चा परिसर ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू ला साजेसे व सर्वांना अभिमान वाटेल असं यश मिळवा असे मत माजी प्राचार्य विजय डोणे यांनी मांडले. ते येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेत आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी कौतुक, बक्षीस हे तुम्हाला पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देते. त्यामुळे मोबाईलचा वापर कमी करून पुस्तक, तंत्रज्ञान व अद्ययावत ज्ञानाचा उपयोग ध्येय साध्य करण्यासाठी करा.
यावेळी वर्षभरात राबविलेल्या शालेय व सहशालेय उपक्रमात तसेच क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. माध्यमिक विभागातून श्रावण खोत व उच्च माध्यमिक विभागातून सोनाली तावडे या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी प्रा. बी. टी. यादव यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ पाच हजार रकमेचा धनादेश देणगी स्वरुपात प्रशालेस प्रदान केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बाबासाहेब माळवे, अहवालवाचन उपप्राचार्या प्रा वनिता खडके, प्रमाणपत्र वाचन प्रा राहूल देशमुख व शितल पत्रावळे, सूत्रसंचालन प्रा सुषमा पाटील व एच.के पठाण व आभार प्रा दिपा सुतार यांनी मानले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष संदिप पाटील, प्रा अनिल लाड यांच्या बरोबर सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.





