SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात 'संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल' कार्यशाळेचे यशस्वी आयोजनकोरे अभियांत्रिकीत सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स शाखेचे उद्घाटनसंस्थांच्या माध्यमातून शेतकरी सभासदांचे हित जपण्याचे काम कौतुकास्पद : अजय पाटील यड्रावकरताणतणावमुक्त जीवन: काळाची गरज आणि आंतरराष्ट्रीय ताणतणाव जागरूकता दिनस्थानिक स्वराज्य संस्था बहुमताने चालायला हव्यात, मोडून काढणे योग्य नव्हे : आमदार सतेज पाटील श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!विकसित भारत युवा संवाद कार्यक्रम : प्रशिक्षणार्थींना लोकशाही मुल्यं, मतदान जनजागृती आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून मार्गदर्शनगोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या कौलाचा अनादर; लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी आवाज उठवावा - आमदार सतेज पाटील यांची सादकेंद्रात, राज्यात सत्ता असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल : खासदार धनंजय महाडिककागल तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; मंत्री हसन मुश्रीफ यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आग्रही मागणी

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात 'संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल' कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

schedule04 Nov 26 person by visibility 132 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग आणि 'कल्चरल क्लब' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय 'संगीत वाद्यांची दुरुस्ती व मूलभूत देखभाल'   ही प्रात्यक्षिक कार्यशाळा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. 

२ आणि ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अधिविभागाच्या छोट्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
या कार्यशाळेसाठी पुण्यातील ज्येष्ठ वाद्यनिर्माते आणि वाद्यदुरुस्ती क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ  हेमकांत  नावडीकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

तानपुरा, तबला आणि हार्मोनिअम यांसारख्या विविध भारतीय शास्त्रीय वाद्यांची दुरुस्ती, त्यांची देखभाल, जवारी काढणे , तबला ओढ काढणे, हार्मोनिअम ट्यूनिंग करणे   याविषयीचे सखोल प्रात्यक्षिक श्री. नवडीकर यांनी विद्यार्थ्यांना दिले. 

 यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, "संगीत क्षेत्रात वादन व गायनाइतकेच वाद्यांची निगा राखणे आणि त्यांची दुरुस्ती समजणे हेही कलाकारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ तात्विक ज्ञान न मिळता प्रत्यक्ष वाद्य दुरुस्तीचे कौशल्याधारित शिक्षण मिळाले पाहिजे." श्री. नावडीकर यांनी विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीतातील रागांचे ज्ञान खेळातून व्हावे या दृष्टिकोनातून तयार केलेल्या ‘सूर ताश’ या पत्त्यांच्या खेळाचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व उपस्थित विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. 

या दोन दिवसीय कार्यशाळेला अधिविभागातील विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापकांची उपस्थिती लाभली. कार्यशाळेचे प्रास्ताविक अधिविभाग प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले. तर आभार सौ. देशपांडे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रशांत देसाई व गिरीधर कुलकर्णी यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes