घोडावत विद्यापीठातील कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
schedule18 Apr 24 person by visibility 296 categoryशैक्षणिक

अतिग्रे : शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचविलेल्या संजय घोडावत विद्यापीठाच्या कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागातील मास्टर ऑफ बिसिनेस ऍडमिनिस्ट्रेशन च्या ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. घोडावत विद्यापीठाने अगदी कमी कालावधीत विविध मानांकने मिळवून आपला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
दरवर्षी संजय घोडावत विद्यापीठाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात. यावर्षी संस्थेने प्रामुख्याने एशियन पेन्ट्स ,जारो एज्युकेशन, एचएफएफसी, टी -कॉग्निशन , सर्चबॉर्न कन्सल्टिंग, वोडाफोन -आयडिया, एअरटेल, इंडिया मार्ट , डि- मार्ट, टाटा ग्रुप , बंधन बँक, स्टँटेक, पिरामल फायनान्स लिमिटेड, सिझफायर ,फेडरल बँक, संजय घोडावत ग्रुप , बायज्यूज, रिलायन्स जिओ, आयडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, आयसीआयसीआय बँक अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी निर्माण करून दिली. निवडलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी पॅकेज 4 लाख तर सर्वोच्च पॅकेज 9 लाख पर्यंत प्राप्त झाले.नैसर्गिक कलचाचणी, तांत्रिक फेरी, एच आर मुलाखत या निकषाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
या निवडीसाठी संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा.डॉ.स्वप्निल हिरीकुडे, आय यु आर संचालक प्रा.डॉ. एन.व्ही.पुजारी, ट्रेनिंग व प्लेसमेंट फॅकल्टी कोऑर्डिनेटर्स प्रा. रोहित लांडगे,प्रा.सागर कुरणे यांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,कॉमर्स व मॅनॅजमेण्ट विभागाच्या डीन डॉ. योगेश्वरी गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.