प्रभाग क्रमांक 11 मधील सत्यजीत जाधव यांच्या प्रचारार्थ सिद्धाळा, टिंबर मार्केट परिसरात प्रचार फेरी
schedule06 Jan 26 person by visibility 231 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : सर्वांगीण सर्व समावेश आणि शाश्वत विकास करण्यासाठी प्रभाग क्रमांक 11 चे शिवसेना महायुतीचे उमेदवार सत्यजीत चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारार्थ सिद्धाळा, टिंबर मार्केट, पद्मावती गार्डन आदी परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रभाग क्रमांक 11 च्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्येक घटकाच्या सन्मान करण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार सत्यजीत चंद्रकांत जाधव निवडणूक लढवत आहेत. आज त्यांच्या प्रचारार्थ सिद्धाळा, टिंबर मार्केट, पद्मावती गार्डन, प्रॅक्टिस क्लब आदी परिसरामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी मोठ्या मोठ्या संख्येने समर्थक सहभागी झाले होते. यामध्ये सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक, विकास शिरगावे, धीरज गायकवाड, अवधूत घाडगे, योगेश घाडगे, इलाई मुल्ला, अविनाश कामटे, राजू पाटील, पिंटू कांदेकर, परिसरातील महिला, समर्थक सहभागी झाले होते.
दरम्यान देशामध्ये महायुती, राज्यात महायुती आता कोल्हापुरातील महायुतीचे सरकार आणण्यासाठी महायुती कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत उतरली आहे. या अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मधील महायुतीचे उमेदवार निलांबरी गिरीश साळुंखे, यशोदा प्रकाश मोहिते, सत्यजीत चंद्रकांत जाधव, माधुरी किरण नकाते, यांनी वारे वसाहत परिसरामध्ये पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी मतदारांना भेटून महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून विजय करण्याचे आवाहन केले. त्यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मोठ्या संख्येने महिला, समर्थक सहभागी झाले होते.

