SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रख्यात वास्तुशिल्पकार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भिर्डी यांचे निधनपशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस"भीमा कृषी प्रदर्शनाच्या शनिवारच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांसह नागरिकांची ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तुफान गर्दीगारगोटीत 'जिल्हा ग्रंथोत्सव २०२५' चा दिमाखात शुभारंभ; ग्रंथदिंडीने वेधले लक्षकृषी प्रदर्शन-कराओके गायन स्पर्धा : आदिती भराडे, वसिम मुजावर यांनी पटकावला प्रथम क्रमांकअतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची घोडावत विद्यापीठाला सदिच्छा भेटभिमा कृषी प्रदर्शनात भागीरथी महिला संस्थेच्यावतीने मोफत झुणका-भाकरी वाटपमहाविकास आघाडीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सोमवारी सत्कारदक्षिण-पश्चिम विभागीय युवा महोत्सवात शिवाजी विद्यापीठ संघाचे घवघवीत यशभाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांचा उद्या रविवारी सत्कार

जाहिरात

 

प्रख्यात वास्तुशिल्पकार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भिर्डी यांचे निधन

schedule15 Feb 26 person by visibility 161 categoryसामाजिक

कोल्हापूर :  प्रख्यात  वास्तुशिल्पकार (आर्किटेक्ट) आणि सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व दिलीप श्रीमंधर भिर्डी यांचे दिनांक १३ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. 
दिलीप भिर्डी यांनी आपल्या अद्वितीय कल्पकतेने आणि सामाजिक बांधिलकीने वास्तुकलेला एक नवे परिमाण दिले.

 त्यांनी पुणे, कोल्हापूरसहित अनेक ठिकाणी उभारलेल्या  वास्तू , वास्तुकलेचा  उत्तम नमुना असून  पर्यावरणपूरक विचारांचा संदेश देणाऱ्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते प्रसिद्ध व्यक्तीपर्यंत सर्व स्तरातील लोकांसाठी त्यांनी दीर्घकाळापासून वास्तुनिर्मिती केली.

पर्यावरण संवर्धन आणि पक्षी प्राणी यांच्या संरक्षणासाठी त्यांनी  उल्लेखनीय योगदान दिले.सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन (सॅप) संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यानी प्रभावीपणे कार्य केले . 
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे , असंख्य शिष्य व चाहत्यांचा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एक  वास्तुकार नव्हे, तर एक उत्तम  व्यक्ती आणि समाजासाठी झटणारे व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा दीप सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes