SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
रग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसादमहायुतीच्या ऐतिहासिक विजयात राधानगरी- भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल; पालकमंत्री प्रकाश आबिटकर व माजी आमदार के. पी. पाटील यांचा विश्वासआंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिन: एक महत्त्वपूर्ण जागतिक मोहीमकोल्हापूर जिल्ह्यात 26 ऑक्टोबरपर्यंत बंदी आदेश लागूपोलीस स्मृती दिनी पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून वाहणार श्रद्धांजलीशिवसेना नगरसेवक आक्रमक; विविध मागण्यांसाठी आयुक्तांना निवेदन!सखोल वैद्यकीय ज्ञान घेऊन आदर्श डॉक्टर बना : डॉ. संजय डी. पाटीलसीपीआरमध्ये कवटीच्या तळाशी संबंधित अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीधरणगुत्तीत आरोग्य शिबिरात ५३० नागरिकांची तपासणीसेवा संकल्प अभियानांतर्गत १६ हजार ६८३ दाखल्यांचे वितरण

जाहिरात

 

रग्गेडियनच्या ‘रंगताली’ दांडिया-गरबा नाईटला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

schedule13 Oct 26 person by visibility 123 categoryसामाजिक

◼️ दोन लाखांहून अधिक रुपयांच्या बक्षिसांचे वितरण; नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तरुणाईचा जल्लोष

कोल्हापूर : कोरगावकर ग्रुप आणि रग्गेडियन जिम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘रंगताली’ दांडिया आणि गरबा नाईट मोठ्या उत्साहात पार पडली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आयोजित या सोहळ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आकर्षक रोषणाई, डीजेच्या तालावरील संगीत आणि पारंपरिक दांडिया-गरब्याच्या उत्साहाने कार्यक्रमाला रंगत आली.

राम कृष्ण हॉल येथे कार्यक्रमाचे उद्घाटन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दांडिया आणि गरबा ग्रुप्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तरुणाईसह नागरिकांनी डीजेच्या तालावर ठेका धरत नवरात्रोत्सवाचा आनंद लुटला. कार्यक्रमात दोन लाखांहून अधिक रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या या दांडिया-गरबा नाईटमुळे कोल्हापुरातील नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर पडली. भव्य आयोजन आणि नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे ‘रंगताली’ सोहळ्याची शहरात विशेष चर्चा सुरू आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन कोरगावकर ग्रुपचे आकाश कोरगावकर, राज कोरगावकर, आशिष कोरगावकर, ओम कोरगावकर, पूनम कोरगावकर, व्यवस्थापक प्रशांत डंगरे, खुशबू तलरेजा, प्रीती भानुशाली, दीप्ती ओसवाल आणि अझरुद्दीन मुल्ला यांनी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes