क्रीडा स्पर्धेतून ताण तणाव कमी आणि कलागुणांनामध्ये वाढ होण्यास मदत मिळेल : पालकमंत्री, प्रकाश आबिटकर
schedule15 Feb 25 person by visibility 296 categoryक्रीडा

▪️जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
कोल्हापूर : अधिकारी- कर्मचारी हे रोजच आपल्या कार्यालयीन कामात गुंतलेले असतात. त्यांना आपल्या दैनंदिन कामातून ताण तणाव कमी होण्याकरिता तसेच त्यांच्यामध्ये लपलेल्या कलागुणांमध्ये वाढ होण्यासाठी क्रीडा स्पर्धेतून चालना मिळणार आहे असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर केले. पोलीस क्रीडागंण येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन समारंभावेळी ते बोलत होते. तसेच सर्व उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना क्रीडा स्पर्धेसाठी सुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि) मनिषा देसाई-शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा) अरुण जाधव, पाणी व स्वच्छता प्रकल्प संचालक माधुरी परीट, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यासह सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींनी आपल्या संचलनात पर्यावरण पूरक सण साजरा करणे, पर्यावरणाचा समतोल राखणे, समाजात एकता दाखविणारे विविध उपक्रमांचे विविध संदेश यावेळी सादर केले. यामध्ये गुडीपाडवा, बैलपोळा, गणेशोत्सव, नागपंचमी, विजायादक्ष्मी, संत बाळुमामा, आषाडी एकादशी, वटपोर्णिमा, होळी, रंगपंचमी, दहीहंडी, नारळी पोर्णिमा, अशा महाराष्ट्रात साजरा करण्यात येणारे विविध सण संचलनावेळी साजरे करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोणत्याही क्रीडा प्रकारात आरोग्य सुदृढ तर होतेच त्याचबरोबर खेळ भावना, सांघिक कौशल्य आणि मानसिक संतुलन सुधारते. कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी मनोगत व्यक्त करून सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, बुध्दिबळ, कबड्डी, खो-खो, सायकलिंग, धावणे, गोळाफेक, भालाफेक व थाळीफेक इ. स्पर्धा होणार आहेत. या क्रीडा स्पर्धेचे आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी सुत्रसंचालन संदीप मगदूम व सविता कुंभार यांनी केले.