टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पेपर फुटीचे रॅकेटचा तपास : मुख्य आरोपीसह आणखीन 11 आरोपींना अटक
schedule24 Nov 25 person by visibility 103 categoryगुन्हे
कोल्हापूर : टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पेपर फुटीचे रॅकेटचा तपास करुन या गुन्हयामधील मुख्य आरोपीसह आणखीन 11 आरोपींना अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली .
टी.ई.टी. परिक्षेचा पेपर परीक्षेपुर्वी देतो असे सांगुन काही विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचेकडून शैक्षणिक मुळ कागदपत्र व रोख रक्कम स्विकारुन फसवणूक करीत असलेबाबत पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना मिळाले माहितीप्रमाणे व त्यांनी केले मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे पथकाने मुरगूड पोलीस ठाणेची मदत घेवून दि. 23 नोव्हेंबर रोजी रात्रौ 01.15 वा. चे सुमारास सोनगे, ता कागल गावचे हददीत शिवकृपा फर्नीचर मॉलमध्ये छापा टाकून त्यांचा कट उघडकीस आणून संपुर्ण रॅकेटचा फर्दाफाश केला. सदरबाबत मुरगूड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 361/2025 बी. एन. एस. कलम 318[4], 62 सह महाराष्ट्र विदयापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणा-या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 चे कलम 8 प्रमाणे दि. 23.011.2025 रोजी गुन्हा दाखल केला.
सदरचा छापा टाकून गुन्हा दाखल केला त्यावेळी नमुद ठिकाणी एकूण 07 आरोपी मिळुन आले होते व त्यांचा मुख्य सुत्रधार महेश भगवान गायकवाड, रा. सातारा हा फरारी होता. नमुद गुन्हा दाखल झालेनंतर अटक सात आरोपींची दि. 25 नोव्हेंबर रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर होती. पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपीकडे तसेच गुन्हयाचे ठिकाणी मिळालेले पुराव्याचे आधारे सखोल तपास करुन सदर गुन्हयात सहभागी असणारे आणखीन 01) रोहीत पांडुरंग सावंत, व.व.35, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, 02) अभिजीत विष्णू पाटील, व.व.40, रा. बोरवडे, ता. कागल, जि. कोल्हापूर, 03) संदिप भगवान गायकवाड, व.व.46, रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा, 04) अमोल पांडुरंग जरग, व.व. 38, रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, 05) स्वप्निल शंकर पोवार, व.व.35, रा. कासारपुतळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर, 06) रणधीर तुकाराम शेवाळे, व.व.46, रा. सैदापूर, ता. कराड, जि. सातारा, 07) तेजस दिपक मुळीक, व.व.22, रा. निमसोड, ता. कडेगांव, जि. सांगली, 08) प्रणय नवनाथ सुतार, व.व.32, रा. खोजेवाडी, ता. जि. सातारा, 09) संदिप शिवाजी चव्हाण, व.व.40, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड, जि. सातारा, 10) श्रीकांत नथुराम चव्हाण, व. व. 43, रा. विद्यानगर कराड, ता. कराड, सध्या रा. उंब्रज ता. कराड, जि. सातारा यांना तसेच सदर रॅकेटचा मुख्य सुत्रधार 11) महेश भगवान गायकवाड, रा. बेलवाडी, ता. कराड, जि. सातारा यास कराड येथून ताब्यात घेतले आहे.
सदर गुन्हयाचा आज पर्यंत केलेले तपासात मुख्य आरोपीसह एकूण 18 आरोपी अटक केले असून नमुद आरोपीत यांची दि. 25 नोव्हेंबर रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे. नमुद गुन्हयाचा तपास सुरु असून आणखीन आरोपी वाढणेची शक्यता आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेशकुमार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, मुरगूड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी करे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री अनिल जाधव तसेच पोलीस अमंलदार युवराज पाटील, राजेश राठोड, विनोद चौगुले, प्रदिप पाटील, राजू कोरे, रोहीत मर्दाने, विजय गोसावी, अमित सर्जे, अमित मर्दाने, निवृत्ती माळी, महेश खोत, सागर चौगुले, महेश आंबी, राजेंद्र वरंडेकर, सुशिल पाटील, शिवानंद मठपती तसेच सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अमंलदार सुरेश राठोड यांनी केली आहे.