SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

नसरापूर चिमुरडी बलात्कार-हत्या प्रकरण: नराधम भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; न्यायालयाने सुनावला 'मृत्यूदंड'

schedule29 Jun 26 person by visibility 291 categoryगुन्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी घडलेल्या भीषण बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल आज पुण्यातील विशेष न्यायालयाने दिला आहे. या अत्यंत क्रूर गुन्ह्यातील आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची (मृत्यूदंड) शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला असून, संपूर्ण महाराष्ट्रात या निकालाचे स्वागत होत आहे.

नसरापूर येथे आजीकडे आलेल्या ३ वर्षांच्या चिमुकलीला आरोपी भीमराव कांबळे याने 'वासरू दाखवतो' असे आमिष दाखवून गोठ्यात नेले होते. तिथे त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या धक्कादायक घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली होती, ज्याचे पडसाद पुणे-बंगळुरू महामार्गावरील रास्तारोको आंदोलनापर्यंत उमटले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली होती.

फास्ट ट्रॅक न्यायालयात चाललेल्या या खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्तींनी अत्यंत कठोर शब्दांत ताशेरे ओढले. न्यायाधीशांनी निरीक्षण नोंदवले की, "हा गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' (रेअरेस्ट ऑफ द रेअर) प्रकरणातील असून तो मृत्यूदंडास पात्र आहे. आरोपीला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नाही. हत्येनंतरही त्याने केलेले कृत्य आणि त्याचे समाजात असणे अत्यंत धोकादायक आहे. त्याने या चिमुकलीला जगण्याचा कोणताही पर्याय ठेवला नव्हता, त्यामुळे त्याला दया दाखवण्याचे कोणतेही कारण नाही."

सुनावणीच्या वेळी पीडित मुलीचे आई-वडील आणि नातेवाईक न्यायालयात उपस्थित होते. सुरुवातीपासूनच पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीला फाशीचीच शिक्षा मिळावी, अशी आग्रही मागणी केली होती. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आज अखेर त्या चिमुकलीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सरकारी पक्षातर्फे सादर केलेले ठोस पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला. या ऐतिहासिक निकालामुळे अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना वचक बसेल आणि समाजात सुरक्षिततेचा एक कठोर संदेश जाईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes