SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार; ८ ऑक्टोबरला माघारीच्या दिवशी पॅनेल जाहीर होणार : मंत्री हसन मुश्रीफमानवतेचे सोने! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूरच्या सफाई दूतांचा आश्किन आजरेकर यांच्या हस्ते गौरवडॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेताभविष्यातील तंत्रज्ञान सहकार्यासाठी केआयटी यु.डब्ल्यू.ए.चा ‘मेजर स्ट्रॅटेजिक पार्टनर’: डॉ.चकमासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूडEMSA INSPIRE 2026 : महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा २४ सप्टेंबर रोजीआंतरराष्ट्रीय शांतता दिन: महत्त्व आणि आजच्या काळाची गरजकचऱ्यात सापडलेले दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कारई-कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन ही काळाची गरज : हिमांशू लेलेकोल्हापूर : इराणी खण येथे 60,352 गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

जाहिरात

 

गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार; ८ ऑक्टोबरला माघारीच्या दिवशी पॅनेल जाहीर होणार : मंत्री हसन मुश्रीफ

schedule21 Sep 26 person by visibility 162 categoryराज्य

कोल्हापूर : राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरातील के.डी.सी.सी. बँकेत पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा करताना महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल आणि ८ ऑक्टोबर रोजी माघारीच्या दिवशी अधिकृत पॅनेल जाहीर केले जाईल, असे स्पष्ट केले. तसेच गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.
पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ निवडणुकीसह राज्यातील दुष्काळस्थिती, राजकीय घडामोडी आणि विविध प्रश्नांवर सविस्तर उत्तरे दिली.

गोकुळ दूध संघ निवडणूक आणि महायुतीची भूमिका
▪️संख्याबळ आणि पॅनेल: भाजपच्या शक्तीप्रदर्शनाबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, केवळ अर्ज किती भरले यापेक्षा संख्याबळ किती आहे हे महत्त्वाचे आहे. संख्याबळावरच उमेदवारी मिळणार असून त्यानुसारच आमचे पॅनेल ठरले जाईल. जागावाटपाच्या चर्चेला ७ ऑक्टोबर रोजी पूर्णविराम मिळेल.

 ▪️ प्रचार शुभारंभ: घटस्थापनेच्या दिवशी रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता महासैनिक दरबार येथे पॅनेलचा प्रचार शुभारंभ होईल.
 * अदृश्य शक्ती: अदृश्य शक्तीबाबत विचारले असता, "आता अदृश्य शक्ती लुप्त झालेली आहे," अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

▪️राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शासनाचे नियोजन
 * शासन ठामपणे पाठीशी: राज्यामध्ये मागील दीड महिन्यात पावसाचा खंड पडल्याने पिके धोक्यात आली असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकार कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही, असे स्पष्ट करत मंत्री मुश्रीफ म्हणाले की, प्रसंगी केंद्र सरकारच्या मदतीच्याही वरती जाऊन शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

 * पाण्याचे नियोजन: येत्या ३-४ दिवसांत 'ऑरेंज अलर्ट' असून चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन करूनच पाणी शेतीसाठी वापरावे लागेल. सांगली जिल्ह्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात उपसाबंदीबाबत बोलताना, हाता-तोंडाला आलेल्या पिकांना पाणी देऊन ती वाचवणे हीच पहिली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 * विशेष अधिवेशन: कर्नाटक राज्याप्रमाणे विशेष अधिवेशन बोलाविण्याबाबत उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री यावर योग्य ती भूमिका स्पष्ट करतील.

▪️इतर महत्त्वाचे मुद्दे
 * शरद पवार यांचे दौरे: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्याबाबत ते म्हणाले की, संकटाच्या काळात पवार साहेबांनी अनेकदा दौरे केले आहेत. त्यांनी विश्रांती घेण्याची गरज असली तरी, जनता आणि शेतकऱ्यांविषयीची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

 * सामाजिक सलोखा व आरत्या: कोल्हापूर जिल्ह्यात दर्गे आणि मशिदीमधून गणपतीची प्रतिष्ठापना होण्याच्या परंपरेवर बोलताना ते म्हणाले की, शाहू महाराजांचा समतेचा संदेश आपल्या रक्तात भिनला आहे. हिंदू-मुस्लिम एकोपा असून मी काल दिवसभरात १०० आरत्या केल्या आहेत, दोन-तीन दिवसांत त्या ५०० पर्यंत जातील.

 * औषध निरीक्षक परीक्षा: परीक्षा रद्द झाल्याच्या मुद्यावर बोलताना, सरकारने कठोर भूमिका घेतली असून या परीक्षा पुन्हा पारदर्शक पद्धतीने घेतल्या जातील व विद्यार्थ्यांचे कष्ट वाया जाऊ दिले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 * आमदार रोहित पवार: रोहित पवार एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून मोकळी स्पेस शोधत आहेत, असे सांगत पेपरफुटी आणि दुष्काळाच्या मुद्यावर राज्य शासन अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 * राहुल गांधी: राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावर बोलताना त्यांनी संयम बाळगण्याचा सल्ला दिला आणि पंतप्रधानांच्या टिकेवर नाराजी व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes