SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तमदलगे येथे आरोग्य शिबिरात ४३० जणांची तपासणीगोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आणि 'बजाज स्टेप'च्या पहिल्या तुकडीचा दिमाखदार पदवीदान समारंभ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचा जागतिक पातळीवर डंकाचाकूचा धाक दाखवून वृद्ध महिलेला लुटणारा आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाईकोल्हापुरात एलसीबीची धडक कारवाई; २ लाखांच्या एम.डी. ड्रग्ससह दोघे जेरबंदपुणे विभाग शिक्षक मतदार संघाकरिता निवडणूक निरीक्षकांची नियुक्तीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या लोकसेवेच्या कार्यकाळानिमित्त कोल्हापुरात ‘सेवा ज्योती यात्रा’राष्ट्रीय नूडल दिन: चवदार नूडल्सचा खास सोहळा!शिक्षक निवडणुकीसाठी सतेज पाटलांच्या जोडण्या; पुण्यातून फुंकले प्रचाराचे रणशिंग

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही उद्या पॅनेल जाहीर करणार : आमदार सतेज पाटील

schedule06 Oct 26 person by visibility 160 categoryउद्योग

पुणे :  गोकुळ निवडणुकीत महायुतीत एकवाक्यता नाही म्हणून बिनविरोधच पिल्लू सोडून चर्चा भरकटण्याचा प्रयत्न करत आहेत तर माझे नातेसंबंध असलेली भाचीला राज्यपाल कोट्यातून आमदार पद का दिले नाही. भाजपचीही खेळी सर्वांना माहित आहे त्यामुळेच पुणे पदवीधर व शिक्षक मतदार साठी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणणार  असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

 पुणे येथे महाविकास आघाडीच्या वतीने शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीमध्ये एकवाक्यता नसून जागावाटपावरून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मोठी चढाओढ सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना जादा जागा मिळू नयेत, यासाठी खुद्द महायुतीतूनच प्रयत्न केले जात आहेत. याच राजकीय समीकरणांमधून बिनविरोध निवडणुकीची चर्चा किंवा 'पिल्लू' सोडण्यात आले आहे; मात्र गोकुळची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध होणार नाही, असा स्पष्ट इशारा काँग्रेसचे आमदार सतेज  पाटील यांनी दिला आहे. तर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या पॅनेलच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी, ७ ऑक्टोबर अधिकृतपणे जाहीर करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाबाबत बोलताना त्यांनी महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल, त्याचा आपण पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. "राजकारण वेगळे आणि नातेसंबंध वेगळे असतात  असे सांगत त्यांनी विरोधी पक्षाच्या रणनीतीवर टीका केली.भाजपला जर डॉ. ग. गो. जाधव व पी. डी. पाटील यांच्या विषयी इतकेच प्रेम होते, तर त्यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून डॉ. स्मिता जाधव यांना आमदार का केले नाही? भाजपचा राजकीय डाव नेमका काय आहे, हे जनता आणि सर्वांना चांगले ठाऊक आहे. आम्ही महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून आणू असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes