+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविधानसभा निवडणूक 2024 : कोल्हापूर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दि.29 ऑक्टोबर रोजी एकूण 131 उमेदवारांनी 188 उमेदवारी अर्ज दाखल; शेवटच्या दिवसाखेर जिल्ह्यात 10 जागांसाठी 221 उमेदवारांनी एकुण 324 उमेदवारी अर्ज दाखल adjust कोल्हापूर जिल्ह्यातील 3 हजार प्राथमिक व 2 लाख 51 हजार माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी पत्र लेखनातून केले पालकांना मतदानाचे आवाहन adjustशिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार; अधिकारी, जवानांना उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळणार adjustकोल्हापूर महानगरपालिकेतर्फे मतदान जनजागृतीचे स्टिकर्स देऊन दीपावलीच्या शुभेच्छा adjustकोल्हापूर महानगरपालिका : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या 7 व्यापाऱ्यांकडून 45 हजार रुपये दंड वसूल adjustकोल्हापुरात दिवाळी खरेदीसाठी रस्ते गर्दीने फुलले; खरेदीचा उत्साह शिगेला! adjustकळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदी निर्मित वस्तुंच्या प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते उद्घाटन adjustकोल्हापूर जिल्ह्यात 12 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू adjustडीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी बनविले दिपावलीसाठी ‘प्लॅस्टीक बॉटल व प्लॅस्टीकच्या चहाच्या कपापासून आकाशकंदील व इतर साहित्य’, नैसर्गिक स्त्रोताचा वापर करुन दिवाळी साजरी करण्याचे विद्यार्थ्यांचे अवाहन adjustकोल्हापुरात एकाचा दगडाने ठेचून खून; हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात
1001185766
IMG-20241021-WA0036
schedule21 Jun 24 person by visibility 217 categoryराज्य
▪️ सहायक आयुक्त समाज कल्याण व महावीर महाविद्यालयाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस साजरा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे महत्वपूर्ण काम ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती करत असल्याचे प्रतिपादन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले. सहायक आयुक्त समाज कल्याण व महावीर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. 

भारताच्या संविधानातील राज्य धोरणाच्या निदेशक तत्त्वामध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालवता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारीरिक, मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृद्धापकाळात त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 16 जून 2004 रोजी राज्याचे ज्येष्ठ नागरिक धोरण 2004 भाग एक जाहीर केले आहे. या अंतर्गत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमात भारती विद्यापीठाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अभिनंदन मुके यांनी भारती हॉस्पिटलच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरता राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच वैद्य अनघा किनिंगे चिकिस्तक, काया चिकित्सा विभाग, भारती विद्यापीठाचे भारती हॉस्पिटल कोल्हापूर यांनी भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व, उपचार पद्धती व योगाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे जीवन सुखकार करण्याबाबत माहिती दिली.

हा कार्यक्रम महावीर महाविद्यालय येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व महावीर महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक मानसिंग जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन कांबळे, यांनी केले. तर आभार समाजकल्याण निरीक्षक चित्रा शेंडगे यांनी मानले.

 कार्यक्रमासाठी कार्यालय अधिक्षक सचिन पाटील तसेच महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी दिलीप पेठकर व ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. लोखंडे व कनिष्ठ सहाय्यक स्वाती पाटील, प्रशांत गायकवाड यांनी सहकार्य केले.