देशसेवेच्या वाटेवर तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेजचे विद्यार्थी; इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल विभागातील तिघांची इंडियन आर्मीमध्ये निवड
schedule22 Jan 26 person by visibility 55 categoryशैक्षणिक
वारणानगर : देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण यांच्या जोरावर तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेज, वारणानगर येथील तीन विद्यार्थ्यांनी इंडियन आर्मीमध्ये स्थान मिळवत महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला आहे.
महाविद्यालयाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील दोन व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील एका विद्यार्थ्याची भारतीय सैन्यात यशस्वी निवड झाली आहे.
निवड झालेले विद्यार्थी :
🔹 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग
१) विभास रायसिंग पाटील
२) वेदांत तुकाराम पाटील
🔹 मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग
१) प्रथमेश पोपट सुर्यवंशी.
या निवडीमागे विद्यार्थ्यांची शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी, अभ्यासातील सातत्य तसेच महाविद्यालयात मिळालेले शिस्तबद्ध मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. देशसेवेचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
या गौरवपूर्ण यशाबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, प्राचार्य पी. आर. पाटील, मार्गदर्शक डॉ. पी. एम. पाटील, शैक्षणिक समन्वयक एस. व्ही. सुर्वे इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या यशस्वी सैनिकी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.