‘शिवशस्त्रशौर्यगाथा – वाघनख’ प्रदर्शनाचा उद्या अखेरचा दिवस
schedule31 Oct 26 person by visibility 104 categoryराज्य
◼️राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ संग्रहालय सोमवार वगळता नियमित सुरू राहणार
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले “शिवशस्त्रशौर्यगाथा-वाघनख प्रदर्शन रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ पर्यंतच पर्यटक व शिवप्रेमी जनतेसाठी खुले राहणार आहे.
या प्रदर्शनानंतर, राज्य संरक्षित स्मारक असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ संग्रहालय, लक्ष्मी विलास पॅलेस, कोल्हापूर हे नियमानुसार दर सोमवारी बंद राहील आणि सोमवार वगळता इतर दिवशी सर्व पर्यटकांसाठी नियमितपणे खुले राहील.
तरी, सर्व पर्यटक व शिवप्रेमींनी या प्रदर्शनाचा अंतिम दिवसापर्यंत लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.