SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : उपसा बंदीला २६ जूनपर्यंत पुन्हा शिथिलताक्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास ; शहरातील युवकांच्याकडून नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे उद्यापासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्जाची मुदत वाढली; आता २ जुलैपर्यंत अर्ज करता येणारअवसायकांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका; फणसवाडीच्या हनुमान सहकारी दूध संस्थेच्या याचिकेवर निर्णयकरवीर नगरीत खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवितयुवा पिढीला नशामुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध; प्रत्येक जिल्ह्यात होणार व्यसनमुक्ती केंद्र: मुख्यमंत्री फडणवीसजागतिक ऑलिम्पिक दिन: क्रीडा संस्कृतीचा उत्सवडीकेटीई टेक्स्टाईलच्या आठ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल लि.कंपनीमध्ये निवडसामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठी कोल्हापूरवासीय सज्ज

जाहिरात

 

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे उद्यापासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’

schedule23 Jun 26 person by visibility 107 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने बारावी उत्तीर्ण व वास्तुकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प’ चे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. २४ व गुरुवार दि. २५ जून रोजी होणाऱ्या या उपक्रमात ‘डीझाईन, डीस्कव्हर, ड्रॉ’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वास्तुकला क्षेत्रातील विविध पैलूंचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

बूट कॅम्पच्या पहिल्या दिवशी नोंदणी व स्वागत समारंभानंतर ऑगमेंटेड रिअॅलिटी (ए.आर.) व व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्ही.आर.) तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. तसेच फेविक्रिल पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, विविध सर्जनशील उपक्रम व मार्गदर्शन सत्रेही आयोजित करण्यात आली आहेत.

दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक पन्हाळा येथे  नामवंत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्केचिंग कार्यशाळा तसेच फोटोग्राफी विषयक उपक्रम राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारसा वास्तूंचे निरीक्षण, रेखाटन आणि दृश्य सादरीकरणाचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

विविध उपक्रमांतील उत्कृष्ट सहभागी विद्यार्थ्यांना पारितोषिके व सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. वास्तुकलेविषयीची जिज्ञासा आणि सर्जनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  वास्तुकला क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रमुख आर्की. इंद्रजीत जाधव यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes