SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शाश्वत कृषी विकासासाठी विविध विद्याशाखांत समन्वय आवश्यक : डॉ. ज्योती जाधवकोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क येथे दोन हेक्टर जागा हस्तांतरित : आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यशराज्यातील ५७ सिंचन प्रकल्पांचे काम मार्गी लागणारराज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांच्या बक्षीस रक्कमेत भरघोस वाढराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून; अर्थसंकल्प ६ मार्च रोजीआनंदसाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीमधील गैरव्यवहार : ठेवी परत देण्यासाठी जलद गतीने कार्यवाही करावी : सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारलाचित्रपट निर्मितीचा ध्यास बाळगा : रणजित जाधव बी. ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांशी संवादडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे ग्रीडडीबी आयओटी हॅकॅथॉनमध्ये ७५० डॉलर्सचे तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्राप्तकोल्हापूर जिल्हास्तरीय लोकशाही दिन 2 मार्च रोजी

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्क येथे दोन हेक्टर जागा हस्तांतरित : आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश

schedule11 Feb 26 person by visibility 126 categoryराज्य

कोल्हापूर  : येथील भाऊसिंगजी रोडवर कोल्हापूर महानगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आहे. या संस्थानकालीन इमारतीतून महापालिकेचा स्थापनेपासून कारभार चालवला जात आहे. कालपरत्वे इमारत अपुरी पडू लागल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेसाठी नव्या प्रशासकीय इमारतीची मागणी होत होती. शहराचा वाढत जाणारा विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता शेंडा पार्क येथील कृषी विद्यापीठाच्या जागेमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात यावी अशी मागणी आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री, सह पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शेंडा पार्क इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गट नंबर 602/2 मधील दोन हेक्टर जागा कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी राखीव ठेवण्याचे आदेश पारित केले. 

6 फेब्रुवारी 2026 रोजी हे आदेश पारित केल्यानंतर सदर जमिनीच्या सातबारा पत्रकात इतर हक्कांमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

 यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशस्त प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 
पाच एकरांच्या विस्तीर्ण परिसरामध्ये महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत, पार्किंग, नागरी सुविधा केंद्र, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची दालने तसेच सभागृह उभारण्यात येणार असून लवकरच यासंबंधीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन प्रशासकी इमारतीसाठी शेंडा पार्क येथे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आभार मानले आहेत. 

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे विविध प्रशासकीय इमारतींची उभारणी करण्यात येत आहे. याच ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी तसेच भविष्यातील सर्किट बेंच आणि आयटी पार्क उभारण्यात येणार असल्यामुळे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी हे ठिकाण अगदी योग्य म्हणावे लागेल. नव्या प्रशासकी इमारतीत महापालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज एकाच छताखाली चालणार असल्यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. अशी प्रतिक्रिया आमदार अमल महाडिक यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes