SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदककोल्हापूर महानगरपालिका : चालू आर्थिक वर्षात घरफाळा व पाणीपट्टीसाठी अभय योजना लागू करण्याचा कोणताही विचार प्रशासनाचा नाही- आयुक्त डॉ.राजेंद्र भारूडघोसरवाडच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; २१४ नागरिकांची तपासणीसरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे चालु गळीत हंगामाचे रू. ३९०० प्रमाणे उसबिल जमा : अध्यक्ष नवीद मुश्रीफ राजेश चषक : जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेत के एस के विजेताएकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर अभय भोसले, वेदांत बागड, रिशान पिलांकर विजेतेपदसेवा आयुष्यभराची… सुरक्षितता निवृत्तीनंतरची! जुनी पेन्शनसाठी आमदार कौस्तुभ गावडे कटिबद्ध!लोकसेवेचा वारसा व बाळासाहेबांचे विचार अखंड पुढे नेणार : आ. राजेश क्षीरसागरआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणजुगुळ-खिद्रापूर पुलाचा भूसंपादनाचा तिढा लवकरच सुटणार; आमदार यड्रावकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ २७ नोव्हेंबरला; तनुजा साळोखे यांना राष्ट्रपती, तर वेदिका कदम यांना कुलपती सुवर्णपदक

schedule25 Nov 26 person by visibility 139 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ केंद्रीय पद्धतीने शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील सन्माननीय अतिथी म्हणून, तर भारतीय लष्कराचे माजी प्रमुख व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल (निवृत्त) जे. जे. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या दीक्षांत समारंभाच्या अनुषंगाने  माहिती देण्यासाठी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्या अध्यक्षतेखाली व प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी आज दुपारी  मुख्य प्रशासकीय भवनातील व्यवस्थापन परिषद सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

यंदाच्या समारंभात सर्वसाधारण कौशल्यासाठीचे 'राष्ट्रपती सुवर्णपदक' एमबीए अधिविभागातील तनुजा बाजीराव साळोखे यांना, तर एम.ए. मानसशास्त्र विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल 'कुलपती सुवर्णपदक' कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर येथील वेदिका उमेश कदम यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक कार्यातील असाधारण योगदानासाठी पीएच.डी. पदवीधारक विशेष सन्मान श्रेणीत डॉ. दीपक सावंत यांचा गौरव केला जाणार आहे.

◼️समारंभातील ठळक बाबी व नियोजन:
 * यंदा एकूण ६०,२५० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येणार असून त्यामध्ये ३४,६७० (५७.५४%) विद्यार्थिनी आणि २५,५८० (४२.४६%) विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
 * २०,०५३ पदवी प्रमाणपत्रांचे विद्यापीठ प्रांगणात वाटप होणार असून ४०,१९७ प्रमाणपत्रे पोस्टाने पाठवली जाणार आहेत.
 * सर्व पदवी प्रमाणपत्रे द्विभाषिक स्वरूपातील असून त्यावर ऑनलाइन पडताळणीसाठी क्यूआर कोड (QR Code) देण्यात आला आहे; तसेच स्वायत्त महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना संयुक्त पदवी प्रमाणपत्रे मिळणार आहेत.
 * दीक्षांत समारंभाच्या पूर्वसंध्येला गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी कमला कॉलेज येथून ग्रंथदिंडी मिरवणूक निघणार असून विद्यापीठ परिसरात 'ग्रंथमहोत्सव २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे.
 * सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशद्वार क्र. १ मान्यवरांसाठी राखीव ठेवण्यात आले असून इतरांनी प्रवेशद्वार क्र. २, ६, ८ व सिंथेटिक ग्राउंड गेटचा वापर करावा, तसेच केवळ विद्यापीठाच्या मानवी वस्त्राचा वापर करूनच फोटो काढावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes