SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान, तर मतमोजणी...NMMS परीक्षेची अंतिम उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्धदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजलीशिवाजी विद्यापीठात अजित पवार यांना श्रद्धांजलीपंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहनउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान आणि ई-कॉमर्सचा वापर गरजेचा : विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांचे प्रतिपादन ग्रंथ विक्रेत्यांना ग्रंथोत्सवात सहभागी होण्याबाबत आवाहनमहाराष्ट्राची तनु भान देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट'; प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानितप्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट

जाहिरात

 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारी रोजी मतदान, तर मतमोजणी...

schedule29 Jan 26 person by visibility 114 categoryराज्य

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान; तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांच्यी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील. आता 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजता होईल. संबंधित ठिकाणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रसिद्ध केली जातील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes