कोल्हापूर शहरात १३ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा; धरणातील पाणीसाठा घटल्याने निर्णय
schedule12 Jun 26 person by visibility 136 categoryसामाजिक
कोल्हापूर: अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. याचा थेट परिणाम काळम्मावाडी धरणातील पाणीपातळीवर झाला असून, पाणीसाठा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. तसेच, काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे होणारा पाणी उपसा बंद पडल्याने शहराची तहान भागवणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व काटकसरीने व्यवस्थापन करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने १३ जून २०२६ पासून शहरासह संलग्न उपनगरांमध्ये 'एक दिवसाआड' पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उपसा सुरू करण्यात आला असून, आगामी पावसाची स्थिती आणि पंचगंगा नदीतील उपलब्ध साठा लक्षात घेऊन पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पाणी वितरणाचे वेळापत्रक खालील प्रमाणे