चंबुखडी मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व दुरुस्तीमुळे सोमवारी बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार
schedule27 Nov 26 person by visibility 85 categoryमहानगरपालिका
◼️मंगळवारी अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा
कोल्हापूर : चंबुखडी टाकीवरून येणाऱ्या २७ इंची मुख्य गुरुत्ववाहिनीवरील व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही दुरुस्ती करण्यात येत असून, या कालावधीत संबंधित मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे बालिंगा जलउपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या परिसरातील सोमवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ रोजीचा दैनंदिन पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मंगळवार, दिनांक १ डिसेंबर २०२६ रोजीचा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.
यामध्ये ए, बी वॉर्ड व त्यास संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी, क्रशर चौक, आपटेनगर टाकी, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतिसिंहनाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेतील काही भाग, दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ चौक, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब, खानविलकर पेट्रोलपंप, शाहूपुरी पाचवी, सहावी, सातवी व आठवी गल्ली, कुंभार गल्ली आणि बागल चौक आदी परिसरांचा समावेश आहे.
नागरिकांनी पाणीपुरवठा बंद राहण्याच्या कालावधीचा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.