SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा कधी पडणार?, शिवसेनेसह जिल्हाप्रमुखांचा सवालगोकुळच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून समाजात चुकीचा संदेश पसरविणाऱ्या निवडणूक प्राधिकरणाचे अधिकारी अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कडक कारवाई करामानवतेचा आधारस्तंभ: जागतिक रेड क्रॉस दिवसडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे दोन संशोधक देशात ‘टॉप टेन’ मध्ये : डॉ. सी. डी. लोखंडे तिसऱ्या तर डॉ. प्रमोद एस. पाटील आठव्या स्थानी प्रतीक्षा संपली! दहावीचा निकाल उद्या ८ मे रोजी दुपारी १ वाजता; 'या' संकेतस्थळांवर पाहता येणारविद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलकृषी योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरअधिकाऱ्यांनो, जनतेचा अंत पाहू नका; २७ जूनपर्यंत पाणी न मिळाल्यास गाठ आमच्याशी आहे!पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आमदार यड्रावकर यांना निवेदनके.एम.टी.सवलत पास वितरण केंद्राच्या वेळेत बदल

जाहिरात

 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तावडे हॉटेल परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेचा हातोडा कधी पडणार?, शिवसेनेसह जिल्हाप्रमुखांचा सवाल

schedule08 May 26 person by visibility 111 categoryराज्य

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका आणि उचगाव ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर बांधकामांच्या प्रश्नावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. तावडे हॉटेल आणि गांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला असून, या निकालाची तत्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती देताना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि तालुकाप्रमुख राजू यादव यांनी सांगितले की, शिवसेनेच्या वतीने २०१२ पासून या बेकायदेशीर बांधकामांविरोधात लढा दिला जात आहे. आंदोलने, गांधीनगर बंद आणि कायदेशीर पाठपुराव्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे प्रशासनाला बंधनकारक आहे. हा निकाल म्हणजे नियमबाह्य कामे करणाऱ्यांना चपराक असून, प्रशासनाने आता कोणताही विलंब न लावता ही अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत.

जर प्रशासनाने या बांधकामांना अभय देण्याचा प्रयत्न केला किंवा कारवाईत दिरंगाई केली, तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच, या बेकायदेशीर बांधकामांना खतपाणी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा, या प्रकरणावर दाद मागण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतला आहे.

 यावेळी मंजित माने, राजू सांगावकर, सागर साळोखे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes