महिला लोकशाही दिन - 27 ऑक्टोबर रोजी
schedule16 Oct 25 person by visibility 221 categoryराज्य
कोल्हापूर : ऑक्टोबर महिन्यातील महिला लोकशाही दिन सोमवारी म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
महिला लोकशाही दिनास महिलांनी आपल्या तक्रारी, अडचणी शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक कराव्यात. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा व आस्थापना विषयक बाबी, सामुहिक तक्रारींचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत,
असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.