SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद कक्ष (ERSU) स्थापन; विशेष वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणशिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंती उत्साहात डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची फिन्युलेंट कंपनीत आकर्षक पॅकेजवर निवडसामाजिक न्याय दिनी शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी उत्साहातराजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादनराजर्षी छत्रपती शाहू महाराज : लोकोत्तर राजापरिवर्तनाचे शिल्पकार : राजर्षी शाहू महाराजअमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस: एक सामाजिक जागृतीउदगाव ग्रामीण रुग्णालयात २६ पदसंख्या भरतीला मंजुरी : आमदार यड्रावकरसीपीआर नूतनीकरण वास्तूचे जुलैच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत उद्घाटन : मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची फिन्युलेंट कंपनीत आकर्षक पॅकेजवर निवड

schedule26 Jun 26 person by visibility 78 categoryशैक्षणिक

  इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या सिव्हील, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल व इटीसी विभागातील १४ विद्यार्थ्यांची नामांकित फिन्युलेंट सोल्यूशन्स प्रा.लि. या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीत कॅम्पस इंटरव्हुवद्वारे आकर्षक वेतन पॅकेजवरती निवड झाली आहे.
फिन्युलेंट ही ऑटोमेटीव्ह, इलेक्ट्रीक व्हेईकल्स, जनसेटस आणि इंडस्ट्रीयल अ‍ॅटोमेशन क्षेत्रासाठी अत्याधुनिक पॉवरट्रेन कंट्रोल सिस्टीम्स, एम्बेडेड इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्ट कंट्रोल सोल्यूशन्स विकसित करणारी अग्रगण्य कंपनी आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाधिष्ठीत कामकाज आणि उद्योगाभिमुख नवकल्पनांच्या जोरावर कंपनीने राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख निर्माण केली आहे.

  या कॅम्पस इंटरव्हयूव मधून डीकेटीईचे विद्यार्थी सिध्दी भस्मे, वैष्णवी घारगे, फारुक मकानदार, अभिषेक कलकुटकी, सृष्टी सावंत, आनंद पाटील, प्रथमेश शेंडगे, प्रतिक्षा रोकडे, अंकिता पाटील, मृदुला पोतदार, सानिया नेमिष्टये, अनुजा घाटगे, स्नेहा कार्वेकर व निकिता ताटे यांची फिन्युलेंट या इंडस्ट्रीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळाली आहे.

  उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा लक्षात घेवून डीकेटीईमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर विशेष भर दिला जातो. आधुनिक सॉफटवेअर्स, प्रोग्रॅमिंग आणि उदयोगाभिमुख प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान अधिक सक्षम केले जाते. तसेच संवादकौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि सॉफट स्किलसाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. दर्जेदार शिक्षण व उत्कृष्ट प्लेसमेंटच्या बळावर डीकेटीई संस्था विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी विश्‍वासार्ह केंद्र म्हणून ओळखली जाते.

  या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर.नाईक, डॉ.आर.एन.पाटील, डॉ. जे. पी. खरात, डॉ एस.के.पाटील टीपीओ जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes