SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डीकेटीई टेक्स्टाईलच्या आठ विद्यार्थ्यांची वर्धमान टेक्स्टाईल लि.कंपनीमध्ये निवडसामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठी कोल्हापूरवासीय सज्जमहिलांचे सशक्ती व सक्षमीकरणाला जिल्हा परिषद प्राधान्य देणार : डॉ जसमिनअग्निवीर भरती संदर्भात आढावा बैठक संपन्न१० हजार जणांना मिळणार रोजगारांची संधी ; आमदार यड्रावकरांच्या पाठपुराव्याला मोठे यशडी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरला प्रतिष्ठेची ‘आर्किटेक्ट लुईस आय. कान ट्रॉफीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 15 जुलैपर्यंत अर्ज करावेतकोल्हापूरसह चार जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या सराईत चेन स्नॅचर टोळीचा पर्दाफाश; दोन आरोपी गजाआडपिरवाडी येथे हातभट्टी दारूविरुद्ध संयुक्त कारवाईजयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र देशात आदर्श ठरणार : आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर

जाहिरात

 

महिलांचे सशक्ती व सक्षमीकरणाला जिल्हा परिषद प्राधान्य देणार : डॉ जसमिन

schedule22 Jun 26 person by visibility 99 categoryसामाजिक

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एक लाख आठ हजार इतक्या एकल महिलाअसून त्यांच्या सशक्ति व सक्षमीकरणाला जिल्हा परिषद प्राधान्य देईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जसमिन यांनी दिली .

  जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावरील समिती सभागृहात आज, एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत,जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग (जि.प) नितीन मस्के,महिला बालकल्याण विभागाच्या सभापती श्रीमती विद्या पाटील , अर्थ व शिक्षण सभापती सारिका नांदेकर , जि .प सदस्या वर्षा सावर्डेकर, आलोक अग्रहरी, एस एस दाडे ,आदी उपस्थित होते .

  मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या ,एकल महिलांच्या समस्यांवर साधक - बाधक चर्चा करून उपाययोजना शोधण्याच्या अनुषंगाने आजच्या या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे संपूर्ण कामकाज हे राज्याला पथदर्शी होईल असा आशावाद व्यक्त केला. तर श्रीमती विद्या पाटील म्हणाल्या महिला एकल महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यास त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास निश्चितपणाने मदत होईल .प्रारंभी नितीन मस्के यांनी या कार्यशाळे पाठीमागील भूमिका विषद करताना एकल महिलांना येणाऱ्या अनुभवांचा उहापोह केला . या कार्यशाळेसाठी सर्व तालुक्यांचे सीडीपीओ,एकल महिला प्रश्नांच्या अनुषंगाने कामकाज करणाऱ्या स्वयंसेवी संस्था तसेच जि प . चे इतर अधिकारी - कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes