झी मराठीवरील नवी मालिका 'अप्पी आमची कलेक्टर'
schedule23 Aug 22 person by visibility 412 categoryमनोरंजन
कोल्हापूर : येथील कमला कॉलेज येथे झी मराठीवरील नवी मालिका अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या निमित्ताने आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ तेजस्विनी मुडेकर , शिक्षक वर्ग, अप्पी - शिवानी नाईक , बापू - संतोष पाटील तसेच कमला कॉलेजच्या वतीने स्टाफ व विद्यार्थीनी उपस्थित होते.
यावेळी कलाकारांनी आपले अनुभव व्यक्त केले. यानंतर प्रश्नोत्तराचा सुद्धा तास झाला आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा आणि करिअर कडे कसे पाहावे याबद्दल चर्चा करण्यात आली सदर मालिका 22 ऑगस्ट पासून संध्याकाळी सात वाजता सोमवार ते शनिवार प्रदर्शित होणार असून या मालिकेचे चित्रण हे सातारा जिल्ह्यात होत आहे.
झी मराठी वर अप्पी आमची कलेक्टर या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) ह्या मध्यवर्ती भूमिकेतुन नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. शिवानीने या आधी अनेक एकांकिका स्पर्धांमधून भाग घेतला आहे.
ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन नाही.पण तिचं ध्येय खुप मोठ्ठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, " मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणा-या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खुश आहे कारण मी एका ध्येयसमर्पित मुलीची भूमिका करणार आहे.आणि ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.
ह्या मालिकेची निर्मिती केली आहे वज्र Production ने, ह्या आधी वज्र Production च्या झी मराठीवर 'लागीर झालं जी, देवमाणूस, देवमाणुस २' ह्या मालिका गाजल्या आहेत. त्यामुळे ह्या ही मालिकेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. तेव्हा पाहायला विसरू नका. 'आप्पी आमची कलेक्टर ' २२ ऑगस्टपासून, सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.
🟣 ही भूमिका माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे : शिवानी नाईक
झी मराठी वाहिनीवर 'अप्पी आमची कलेक्टर' हि नवीन मालिका २२ ऑगस्ट ,संध्याकाळी ७:०० पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक स्मॉल स्क्रीनवर पदार्पण करत आहे. शिवानी ने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी अप्पी ला पाहिलं आणि या भूमिकेतूनदेखील शिवानी प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळवणार आहे. या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली कि, " ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. मी या मालिकेत अपर्णा सुरेश माने ची भूमिका साकारत आहे . तिचे बाबा रिक्षा चालवतात. तिचा छान घर आहे आणि त्या घरात आई , बाबा आणि भाऊ राहतात. तीच एक स्वप्न आहे कलेक्टर व्हायचं आहे आणि ते ती कस साध्य करते हा तिचा प्रवास दाखवणार आहे. हे मालिकेतून प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. अप्पी सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करून काही तरी करू पाहते आणि हि भूमिका माझासाठी खूप प्रेरणादायी आहे. ह्या भूमिकेसाठी मी खूप मेहेनत घेते आहे आणि मालिका प्रेक्षकांना आवडेल अशी अपॆक्षा ठेवते."