SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका : मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कार्तिकेयन एस यांच्याकडून विविध विभागांचा आढावासाखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी; खासदार महाडिक यांची राज्यसभेत मागणीकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याचा ऊसदर एकरकमी 3150 रूपये जाहीरमहापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणीचिकोत्रा नदी भागामध्ये उपसाबंदी लागूजागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅली उत्साहातएड्स मुक्त जिल्हा म्हणून लवकरच कोल्हापूरची नवी ओळख निर्माण होईल : प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे; जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त रॅलीचे आयोजनउत्कृष्ट लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करामारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान थांबवले, गाव प्रशासनाच्या दहशतीखाली; उत्तम जानकरांचे आरोपअंबप येथे तिघांकडून युवकाचा खून

जाहिरात

 

दुचाकीस ट्रकची धडक; शिक्षक ठार; १ गंभीर

schedule31 Mar 22 person by visibility 25726 categoryगुन्हे

यवतमाळ : चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने दुचाकी चालकाने ब्रेक मारल्याने पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात प्रशांत बुरांडे हे शिक्षक ठार झाले असून श्रीकांत उपाध्ये हे गंभीर जखमी झाले आहेत. आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

वणी येथील प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेले प्रशांत बुरांडे श्रीकांत उपाध्ये हे कुरई येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. 

आज सकाळी शाळेला जात असताना  प्रशांत दुचाकीच्या मागे बसले होते. चारगाव गावाजवळील वळणावर अचानक बैल आडवा आल्याने उपाध्ये यांनी ब्रेक मारला. त्यादरम्यान पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये प्रशांत बुरांडे हे जागीच ठार झाले तसेच श्रीकांत उपाध्ये हे जखमी झाले.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes