कोल्हापूर : चोरीचे सोन्याचे दागीने विक्री करणेस आलेल्या तिघांना पकडून त्यांचेकडून १५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आली. तसेच एका चोरट्याकडून तीन मोटर सायकली असा एकूण ८,००,००० /- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून ०१ घरफोडी व ०३ मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरला यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अमंल शिवाजी जामदार यांना मिळालेल्या माहिती नुसार समर्थ भोपळे, राकेश पाटील व स्वप्निल भोपळे (सर्व रा. मलकापूर, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) यांचेकडे चोरीचे सोन्याचे दागिने असून हे दागिने विक्री करणेकरीता ते येळाणे, ता. शाहुवाडी गावात कोल्हापूर ते रत्नागिरी जाणारे रोडवर मोरया किराणा दुकानासमोर येणार आहेत. अशी माहिती मिळालेने पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अमंलदार शिवाजी जामदार, किरण शिंदे व विनोद कांबळे यांचे पथकाने येळाणे, ता. शाहुवाडी गावात कोल्हापूर ते रत्नागिरी जाणारे रोडवर मोरया किराणा दुकानाजवळ सापळा लावून समर्थ मच्छिंद्र भोपळे, (वय 22), राकेश सदाशिव पाटील, (वय 23) व स्वप्निल शिवाजी भोपळे, (वय 26) (सर्व रा. सणगर गल्ली, मलकापूर, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर ) यांना त्यांच्या ताब्यातील 155 ग्रॅम वजनाचे एकूण 7,50,000/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिन्यांसह पकडून शाहुवाडी पोलीस ठाणे कडील दाखल घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांचा मित्र अमर निवास खामकर याने गेले तीन वर्षापुर्वी संजीवनी सनगर, रा. मलकापूर, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर यांचे घरातून सोन्याचे दागीने चोरून ते विक्री करण्यास त्यांचेकडे आणून दिले असल्याचे सांगितले.
तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार खंडेराव कोळी, संभाजी भोसले, बालाजी पाटील व रविंद्र कांबळे यांचे पथकास मिळालेल्या माहितीप्रमाणे उमेश वसंतराव एटाळे, (वय 48), (रा. कुरणे गल्ली, यादव नगर, कोल्हापूर ) यास ताराराणी गार्डन शेजारी, शाहुपूरी, कोल्हापूर येथे पकडून त्याचेकडून त्याने चोरलेल्या एकूण 50,000/- रूपये किंमतीच्या तीन मोटर सायकली जप्त केल्या आहेत. सदर मोटर सायकल चोरीस गेले बाबत कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुपूरी पोलीस ठाणे व जुनाराजवाडा पोलीस ठाणे तसेच सातारा जिल्ह्यातील कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. आरोपी उमेश वसंतराव एटाळे यास पुढील तपासकामी शाहुपूरी पोलीस ठाण्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार शिवाजी जामदार, किरण शिंदे, विनोद कांबळे, संजय पडवळ, संतोष पाटील, रणजित कांबळे, पांडूरंग पाटील, खंडेराव कोळी, संभाजी भोसले, बालाजी पाटील, रविंद्र कांबळे, रफिक आवळकर व सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार सचिन बेंडखळे यांनी केली आहे.