SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात दसरा महोत्सव शालेय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन; बालवाडी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!धम्मचक्र प्रवर्तन दिन: समता, क्रांती आणि करुणेचा सुवर्णदिनकोल्हापूर महापालिकेच्या १४६ कर्मचाऱ्यांची १५ कोटी ५ लाखांची रक्कम राष्ट्रीय निवृत्ती योजनेकडे वर्गविधान परिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर!विधी शिक्षणातील कौशल्यांचा उपयोग समाजहितासाठी व्हावा : कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्केकोरे डिप्लोमा विद्यार्थ्याची आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड; ६ लाखांचे वार्षिक पॅकेजजिल्हाधिकारी कार्यालय चौक ते आदित्य कॉर्नर या परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाईव्यवसाय परवाना न घेतल्याने राजारामपुरीतील मेहता पब्लिशिंग हाऊसचे दुकान सीलबंदठरावधारकांवर विश्वास नसल्यानेच शपथा घ्यायला लावण्याची महायुतीच्या नेत्यांवर नामुष्की : सतीशचंद्र कांबळे

जाहिरात

 

ग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत

schedule19 Mar 25 person by visibility 652 categoryमहानगरपालिका

कोल्हापुर :महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्यावतीने आज शहरालगतच्या ग्रामीण भागातील 42 अनधिकृत व थकबाकीपोटी 3 नळ कनेक्शन खंडीत  करण्यात आली. शहर व ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार व अनधिकृत कनेक्शन धारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम पाणीपुरवठा विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे.

  यामध्ये आज पाणी पुरवठा विभागाकडील वसुली पथकामार्फत सदाशिव शांता पार्क, शाकंभरी कॉलनी, शिंगणापूर, आर.के.नगर, भारती विद्यापीठ समोरील निगडे मळा, समृधी कॉलनी या शहरालगतच्या ग्रामीण भागातील मिळकत धारकांनी महापालिकेच्या पाण्याच्या लाईन वरून 42 अनधिकृत कनेक्शन जोडून घेतली होती. ही सर्व कनेक्शन आज खंडित करण्यात आली आहे. तसेच पाणी बिल थकीत असलेली 3 मिळकतींचेही नळ कनेक्शन खंडीत करण्यात आले.

 सदरची कारवाई प्रशासक के.मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे व जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. हि कारवाई शाखा अभियंता मयुरी पटवेगार, संजय पाटील, अजीत मोहिते, नरेद्र प्रभावळकर, मधु कदम, अमर बागल यांनी केली.

 ही मोहीम येथुन पुढेही सुरु राहणार असून शहरातील नागरिकांनी आपली अनाधिकृत नळ कनेक्शन रितसर अर्ज करुन व योग्य ते शुल्क भरुन नियमित करुन घ्यावी तसेच पाणी बिलाची रक्कम वेळेवर भरणा करावी व नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिध्द करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटु प्रसंग टाळावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes