कोल्हापूर महानगरपालिका : शुक्रवारीही वेळाने हजर झालेल्या 61 सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई
schedule25 Oct 24 person by visibility 409 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून मंगळवारपासून आरोग्य विभागाच्या कर्मचा-याच्या कामामध्ये सुधारणा होण्यासाठी सकाळी फिरती करुन कारवाई करण्यात येत आहे. आजही उप-आयुक्त व सहा.आयुक्तांनी सकाळी फिरती करुन आरोग्य विभागाची तपासणी केली असता सी-1, सी-2, बी वॉर्ड, मेन ड्रेनेज विभाग व किटक नाशक विभागाकडील 60 सफाई कर्मचारी व 1 मुकादम असे 61 कर्मचारी कामावर वेळाने आलेने त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले आहे.
गेल्या चार दिवसाच्या सतत करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे शहरातील बराचसा कचरा उठाव व स्वच्छता वेळेवर पुर्ण होत आहे. शुक्रवारी उप-आयुक्त पंडीत पाटील व सहा.आयुक्त नेहा आकोडे, संजय सरनाईक व स्वाती दुधाणे यांनी आपआपल्या विभागीय कार्यक्षेत्रामध्ये सकाळी 6 वाजता फिरती करुन हजरी ठिकाणी व प्रभागात कर्मचारी हजर आहे का नाहीत याची तपासणी केली.
यावेळी 61 सफाई कर्मचारी वेळाने कामावर आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांच्यावर आज कारवाई करुन एक दिवसाचे वेतन कपात करण्यात आले.