बरेली येथे 8 ते 16 डिसेंबर रोजी अग्निवीर भरती
schedule14 Nov 25 person by visibility 302 categoryदेश
कोल्हापूर : जाट रेजिमेंटल सेंटर, बरेली यांच्या अंतर्गत आजी माजी सैनिक पाल्य, विधवा पाल्य, आजी माजी सैनिकांचे अवलंबित तसेच खेळाडू यांच्यासाठी 8 ते 16 डिसेंबर रोजी जाट रेजिमेंटल सेंटर, बरेली या ठिकाणी भरती होणार आहे.
जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार यांनी केले.
अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा ई मेल आयडी zswo_kolhapur@maharashtra,gov.in व दूरध्वनी क्र. 0231-2665712 किंवा व्हॉट्सॲप क्र. 9172035612 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा.