कोडोलीत वृद्धाचा डोक्यात वीट घालून खून
schedule12 Nov 24 person by visibility 164 categoryगुन्हे
कोडोली : येथील दत्त मठी येथे डोक्यात वीट घालून गोविंद विठ्ठल पाटील (वय ६५) या वृद्धाचा खून केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. कोडोली येथील वाडीहुडूम येथे राहत होते. खुनाचे कारण समजू शकले नाही.
पाटील नेहमी रात्री दत्त मठी येथे झोपण्यास येत असत. सोमवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आले. यावेळी त्यांच्यासोबत अन्य एक व्यक्ती काही वेळ बोलत बसली होती. काही वेळाने सोबत असणाऱ्या इसमाने तोंडास रूमाल बांधून शेजारी काही अंतरावर असलेली सिमेंटची वीट आणून पाटील यांच्या डोक्यात घातली. यावेळी पाटील यांच्या डोक्यातून व कानातून रक्त आले. पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ कोडोली पोलिसांशी संपर्क साधला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. खूनाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.