SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे​शासकीय वसतिगृह व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी 10 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याचे आवाहनतोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्पमहिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथे अज्ञाताकडून बॉम्बद्वारे घातपात घडवण्याच्या धमकीचा फोन अन्....

schedule10 Dec 24 person by visibility 1114 categoryगुन्हे

▪️एचपी ऑइल गॅसच्या वतीने कागल फाईव्ह स्टार एमआयडीसीत घेण्यात आले बॉम्ब थ्रेड मॉक ड्रिल

कोल्हापूर : वेळ सकाळी 11 वाजताची.. एचपी ऑइल गॅसच्या कागल फाईव्ह स्टार एमआयडीसी येथील मदर स्टेशन येथे एक निनावी फोन आला.. फोनवरुन एका अज्ञात व्यक्तीने गॅस स्टेशनवर बॉम्ब ठेवला असून घातपात घडवणार आहोत, अशी धमकी आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एचपी ऑइल गॅसच्या कंट्रोल रुमने त्वरित एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनवणे यांना या घटनेची कल्पना दिली. श्री. सोनवणे यांनी संबंधित घटनेची माहिती तातडीने पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला दिली.

 घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ हे टीम सह घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अगदी जलद गतीने गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशन टीम, कागल एमआयडीसी फायर ब्रिगेड टीमला पाचारण केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तसेच एचपी ऑइल गॅस कोल्हापूर प्रमुख व लोकल पोलीस स्टेशन यांनी सहकार्याने संपूर्ण परिसर रिकामा करुन परिस्थितीचा ताबा घेतला. काही वेळातच या ठिकाणी बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्कॉड ( बॉम्ब शोध व निकामी पथक) दाखल झाले. या पथकाने त्वरित आपली कारवाई सुरू करून आधुनिक साधनांसह तसेच श्वानासह संपूर्ण परिसराची झडती घेतली.

 दरम्यान पथकास एक बॉम्बसदृश संशयित वस्तू प्राप्त झाली. पथकाने त्वरित ही वस्तू पाहणी करून अत्याधुनिक साधनांनी त्याची तपासणी केली. तपासणी दरम्यान यात कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू अथवा स्फोटके नसल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण खात्री नंतर या पथकाने सर्वांना सुरक्षिततेचा इशारा दिला व उपस्थित सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यानंतर एचपी ऑइल गॅस लिमिटेडचे कोल्हापूर प्रमुख अधिकारी बाबासाहेब सोनावणे यांनी हे एक बॉम्ब थ्रेड मॉक ड्रिल असल्याचे जाहीर केले. कोणतीही पूर्वकल्पना नसताना देखील सर्व शासकीय विभागांनी अत्यंत कमी वेळेत दाखवलेली तत्परता प्रशंसनीय होती. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख प्रसाद संकपाळ, दहशतवाद विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाबर, कागल एमआयडीसी फायर ब्रिगेड विभागाचे प्रमुख संदीप माने, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे पी. वाय. पाटील, बॉम्ब विरोधी पथकाचे राजेंद्र संताराम तसेच एचपी ऑइल गॅसचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes