आपट्याचे पान : वैज्ञानिक महत्व
schedule13 Oct 24 person by visibility 490 categoryसामाजिक
भारतीय संस्कृती ही फार प्राचीन काळापासून ते आज विज्ञान युगापर्यंत जगामध्ये प्रसिद्ध आहे कारण पूर्वी वेदा पासून निर्माण झालेले सर्व ज्ञान आता सध्या जगात त्याचे मत वाढत आहे कारण मनुष्य भौतिक प्रगतीच्या मागे लागला असून त्यास आपल्या संस्कृतीसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी वेळ देता येईन झाला आहे पण त्याचं आरोग्य चांगलं राहायचं असेल तर त्याने आपला संस्कृतीचा विचार करून ज्या काही रूढी परंपरा सण समारंभ केले आहे. त्याची जपणूक केली तरच तो शाश्वत जगामध्ये राहणार आहे.
दसरा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे .नवरात्र झाल्यावर दहाव्या दिवशी विजयादशमी उत्सव साजरा केला जातो.या सणाला पाटी पुस्तके धन शस्त्रे यांची पूजा केली जाते.याच दिवशी देवीच विसर्जन केलं जातं .या दिवशी अनेक शुभ घटना घडल्या आहेत. देवीने महिषासुराचा वध केला श्रीरामाने रावणावर विजय मिळवला.पांडवांनी अज्ञावास संपताच शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे काढून घेतली. विराटच्या गायी पळविणाऱ्या कौरवावर विजय मिळवला.या दिवशी शस्त्र पूजा तसेच सिमोलांघान केले जाते.पूर्वी युधावरून विजय मिळवून आल्यावर विजयत्सव साजरा केला जायचा सोन वाटलं जायचं त्याची आठवण म्हणून आता नातेवाईक मित्रांना आपट्यांची पाने सोने म्हणून वाटतात .तसेच अनेक इतर कथाही याच्याशी संबंधित आहेत.
▪️आपट्याच्या पानांचा आरोग्यासाठी उपयुक्त
दसऱ्याच्या दिवशी आपण स्नेहपूर्वक व आदरभावयुक्त निर्माण होऊन एकमेकांना आपट्याची पाने सोने म्हणून देतो आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात. आजच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मान मोठा असल्याने ती घरी ठेवली जातात. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याची रवानगी खतासाठी केली जाते. रस्त्यावर तर आपट्याच्या पानांचे ढिगारे कचऱ्यात दिसतात. अशावेळी वाईट वाटतं. पण ही आपट्याची पाने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याची आहेत. आपट्याची पाने खाऊन तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता.आपटा ही बहुगुणी वनस्पती आहे. या झाडाची पाने फुले, बिया, सालं औषध म्हणून वापरली जाते. आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखले जाते. अश्मंतक' याचा एक अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा असा आहे. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवला जातो. तर त्याच्या सालापासून डिंक मिळतो. पण त्याव्यतिरिक्तही आपट्याचे बरेच फायदे आहेत.
▪️आपट्याच्या पानांचा औषधी गुणधर्म
१ ) आपट्याची पानं पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी आहेत.
२ ) लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास आपट्याची पाने पाण्यात चांगली ओली करून ती नीट वाटून घ्यावीत. जेवढा रस निघेल तेवढ्याच प्रमाणात दूध-साखर टाकावे. हा दिवसातून चार - पाच वेळा घेतल्याने जळजळ कमी होते.
३ ) हृदयाला सुज आली असेल तर आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळवून ते मिश्रण गाळून प्यावे.
४ ) गालगुंड झाली असल्यास आपट्याची साल पाण्यात शिजवून घ्यावीत. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून तो प्यावा किंवा गंडमाळेवर आपट्याची सालं बांधावीत.
४ ) आपट्याच्या बियांचे बारीक चूर्ण करून ते तूपात चांगले मिक्स करावे. हे मलम एखादा किटक चावल्यास लावता येते. त्यामुळे दाह कमी होतो.
६ ) पोटात मुरडा झाला असेल तर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण मध आणि साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.
दसऱ्याला आपट्याचेच पान 'सोन' म्हणून का वापरले जाते? दसऱ्याला आपट्याच्या पानाला का महत्व आहे? श्रध्दा आणि अंधश्रद्धेची तुमची व्याख्या काय आहे?
दसर्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नयेत, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावीत. यामुळे वास्तूतील वायूमंडल शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेजतत्त्वरूपी आहे. ही तम-रजात्मक असल्याने तिच्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणात आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वाळांनी जिवाचा क्षात्रभाव जागृत होण्यास मदत होते. क्षात्रभाव हा आत्मशक्तीच्या बळावर जिवाला संस्कारात्मक अशा क्षात्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जातांना प्रभू श्रीरामचंद्रांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत शस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानांतून उत्पन्न होणार्या तेजतत्त्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्त मारक शक्ती अखंड कार्यरत राहते.
▪️दसऱ्याला आपट्याच्या पानाला का महत्व आहे?
आपट्याच्या पानाला सोन्याच मोल कां आणि कसं आल ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते.
▪️आपट्याचे सोने व पौराणिक कथा
फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता.
एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्याचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी! तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केल. त्या बदल्यांत आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरुवरतंतू म्हणाले, “ बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा बरं!” पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला मग गुरु म्हणाले, “ मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.” कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षांत ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला तू तीन दिवसांनी ये असं सांगितलं.
रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली. दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः ती मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला हवं तेवढं धन घे म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता.
त्या प्रसंगाची आठवण म्हणून आपट्याच्या पानाला ह्या दिवशी सोनं म्हणून देतात-घेतात. ह्या दिवशी शस्त्र पूजा सुद्धा करतात. पाटीवर सरस्वती काढून तिची पूजा करतात. पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा एक दिवस सुंदर सण-दसरा.
▪️भारतीय संस्कृती नुसार प्रत्तेक सण साजरा करण्या मागे काही ना काही विज्ञान आहे. सण साजरा करता करता मानसिक, बौद्धिक, अध्यात्मिक व शारीरिक प्रगती होत राहावी अशीच आपल्या सणांची रचना आहे.
मराठी महिना आश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजयादशमी किंवा दसरा म्हणून पाळला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र पाळले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरा करण्यात येतो.
▪️दसरा सण मोठा दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसर्याला `दशहरा’ असे म्हणतात. दश म्हणजे दहा व हरा म्हणजे हरल्या आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीने दाही दिशांवर विजय मिळवलेला असल्याने दाही दिशा देवीच्या नियंत्रणात आलेल्या असतात व शक्तीने भारलेल्या असतात. आसुरी शक्तींवर दैवी शक्तींनी मिळविलेल्या विजयाचा हा दिवस; म्हणून या दिवसाला `विजयादशमी’ असेही म्हणतात. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजा ही चार कृत्ये करतात.
▪️शमी व आपटा यांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व : दसर्याला शमीची पाने घरी ठेवून आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे.
▪️यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. दसर्याला रामतत्त्व व मारुतितत्त्व जास्त प्रमाणात कार्यरत असते.
२. आपल्यात क्षात्रभाव जागृत झाल्यास ही तत्त्वे ग्रहण होण्यास मदत होते.
३. शमीमध्ये तेजकण, तर आपट्यात आप व तेज कण अधिक असतात. (पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश ही पंचतत्त्वे आहेत.)
४. शमीकडून प्रक्षेपित होणार्या तेजलहरी आपट्याकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपकणांच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात.
५. जेव्हा आपट्याची पाने सोने म्हणून देतात, तेव्हा त्या लहरी जिवामध्ये आपकणामुळे लगेच झिरपतात व जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो.
▪️आपट्याचे झाड, - आपट्याचे झाड हे जंगलात व माळरानावर वाढत असते,त्याचे आयुर्वेदिक महत्व जास्त आहे. त्याची पाने व फांद्या कापल्याने त्या झाडाचे कोणतेही नुकसान होत नाही तर त्याला आणखीन फुटवे फुटतात व त्याची वाढ आणखी जोमाने होते. सहाजिकच आपट्याची पाने वाटल्याने पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होत नाही.
निसर्गाची फारच काळजी वाटत असल्यास आपट्याची झाडे लावा.
आपण एकविसाव्या शतकाकडे आपण जात असताना वैज्ञानिक दृष्टिकोन आणखी असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी माणूस श्रद्धेच्या आहारी जाऊन अंधश्रद्धा बाळगतो व स्वतःचे नुकसान त्याचबरोबर समाजाचे नुकसान करत असतो.भारताला जर 21 व्या शतकाकडे सक्षमपणे जायचं असेल तर सध्याची पिढी नवीन आव्हाने पेरणारे तयार झाली पाहिजेत तरच आपण आपल्या भारताचा शाश्वत विकास करणार आहोत.
जय हिंद...
✍️ डॉ. अजितकुमार पाटील, केंद्रमुख्याध्यापक, कोल्हापूर.
( लेखक विज्ञान साहित्यचे पीएच डी धारक आहेत.)