ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त सुमारे १५ हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
schedule13 May 25 person by visibility 368 categoryसामाजिक

कळंबा : येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आज 13 मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री महालक्ष्मी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या महाप्रसादाचा सुमारे १५ हजार भाविकांनी लाभ घेतला
ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आज शिवाजी गुरव, संजय गुरव आदींनी देवीची महापूजा बांधली. तर सत्यनारायणाची पूजा अण्णा बराले व सौ वंदना बराले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
काल सोमवारी सकाळी होम हवन घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला होता तसेच दुपारी महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळा उत्साहात पार पडला, रात्री हनुमान भेटीचा मुख्य पालखी सोहळा मोठ्या भक्ती भावामध्ये पार पडला.
लोकनियुक्त सरपंच सुमन विश्वास गुरव, उपसरपंच पुनम उत्तम जाधव, माजी सरपंच विश्वास गुरव माजी सरपंच सागर भोगम आदींच्या हस्ते महाप्रसाद वाटपास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, रोहित उर्फ राहूल मिरजे, संदिप पाटील, रोहित जगताप, विकास पोवार, दिपक तिवले. स्वरुप पाटील, नितीश शिंदे, श्रीमती भाग्यश्री पाटोळे, वैशाली टिपुगडे, छाया भवड, मिना गौड, दिपाली रोपळकर, स्नेहल जाधव, आशा टिपुगडे, संगीता माने, तसेच शशिकांत तिवले, उत्तम जाधव, प्रकाश पाटील,-टोपकर तानाजी पाटील विश्वास खानविलकर संभाजी पवार बावडेकर दिलीप टिपुगडे धनाजी चौगुले उदय सुतार तानाजी साळुंखे विनायक माने, भगवान पाटील, अरुण टोपकर, रणजीत कोंडेकर, तानाजी पाटील श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळ सदस्य, ग्रामस्थ, महिला, गावातील तरुण मंडळाचे सदस्य आदी यावेळी उपस्थित होते,