चिकोत्रा नदीच्या भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर बंदी
schedule20 Nov 23 person by visibility 376 categoryराज्य

कोल्हापूर : चिकोत्रा प्रकल्प चिकोत्रा नदीच्या भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदीचे आदेश कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) उप कार्यकारी अभियंता शिल्पा मगदुम यांनी दिले.
उपसाबंदी क्षेत्र चिकोत्रा नदी को.प.बंधारा 1 ते को.प.बांधारा 29 (बेळुंकी) कालावधी- 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 27 नाव्हेंबर ते 6 डिसेंबर तसेच 27 डिसेंबर ते 5 जानेवारी, 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारी,25 फेब्रुवारी ते 6 मार्च, 25 मार्च ते 3 एप्रिल, 22 एप्रिल ते 1 मे व 16 ते 28 मे या कालवधीत उपसाबंदी लागू राहील.
उपसाबंदी कालावधीत पाण्याचा अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असेही श्रीमती मगदुम यांनी कळविले आहे.