कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्याच्या 32 व्या हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन
schedule15 Oct 24 person by visibility 347 categoryउद्योग
इचलकरंजी : हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सन 2024-25 या 32 व्या ऊस गाळप हंगामासाठी संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे व किशोरी आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न झाला.
शेतकर्यांसाठी कारखान्याच्या विविध योजनांमुळे सन 2024-25 या 32 व्या गाळप हंगामाकरीता सुमारे 20068 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे.
या हंगामातील ऊस गाळपासाठी कारखान्याची मशिनरी व सर्व यंत्रणा सज्ज होत आहे. या हंगामातील ऊस तोडणी वाहतूकीसाठी 413 ट्रक-ट्रॅक्टर, 780 अंगद व डंपींग 780 लहान ट्रॅक्टर, 447 बैलगाड्या आणि ऊस तोडणी 72 मशिन इतक्या तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार झालेले आहेत. या हंगामात व्यवस्थापनाने 20 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तेंव्हा सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकर्यांनी येणार्या हंगामाकरीता पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
या समारंभास कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासो चौगुले, माजी चेअरमन उत्तम आवाडे, सौ. सपना आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, विलासराव खानविलकर, बाळासो दानोळे, कृष्णात पुजारी, रावसाहेब पाटील, पद्माण्णा हेरवाडे, माजी संचालक जयपाल उगारे, रावसाहेब मुरचिट्टे, कल्लाप्पाण्णा गाट, मानसिंगराव देसाई, फैय्याज बागवान, जे. जे. पाटील, रांगोळीच्या सरपंच सौ. संगीता नरदे, सुभाष नरदे, राजाराम सादळे, शिवाजी पाटील, प्रकाश जाधव, उदय पाटील, अनिल वडगावे, अभिजित पाटील-किणीकर, राहूल घाट, दिनकर कांबळे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे, कारखान्याचे संचालक सर्वश्री डॉ. राहूल आवाडे, आण्णासो गोटखिंडे, दादासो सांगावे, सुकुमार किणींगे, सूरज बेडगे, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे, जिनगोंडा पाटील, कमल पाटील, वंदना कुंभोजे व कार्यकारी संचालक मनोहर जोशी आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.