SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
'गोकुळ' निवडणुकीत विश्वासाचा घात; महायुतीचे नेते स्वतःच्याच कार्यकर्त्यांवर अविश्वासी : आ. सतेज पाटील यांचा घणाघातपुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी कौस्तुभ गावडे यांची सोलापूरमध्ये दमदार मोर्चेबांधणी!महायुतीची वज्रमूठ पक्की! कोल्हापुरात प्रचाराचा बिगुल वाजला, विजयाचा दावा ठामसंकलित मूल्यमापन चाचणी (PAT-2) - गुणवत्ता वाढीचा मूलाधार : डॉ. अजितकुमार पाटीलमोरेवाडी येथे स्वयंचलित वाहन चाचणी केंद्र कार्यान्वित; योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहनमहाराष्ट्र सांस्कृतिक विकास मंडळातर्फे नागाळा पार्कमध्ये १९ ऑक्टोबरला भव्य दांडिया सोहळा!पवित्र पोर्टलद्वारे नियमित शिक्षक भरतीसाठी कटिबद्ध; रिक्त पदांची १०० टक्के भरती करण्यासाठी पाठपुरावा करणार : कौस्तुभ गावडेजागतिक अन्न दिन: अन्नाची नासाडी रोखण्याची आणि भूकमुक्तीची प्रतिज्ञागांधीनगरमध्ये टायर पेटवून रिपब्लिकन पक्षाचा जोरदार ‘रास्ता रोको’!पोस्ट ऑफिसमधून दिवाळीचा फराळ परदेशात पाठविणे आता अधिक सुलभ

जाहिरात

 

कागल येथील सीमा तपासणी नाका मंगळवारपासून कार्यान्वीत

schedule09 Dec 24 person by visibility 980 categoryराज्य

कोल्हापूर : प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील कागल येथे महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लि. या शासन नियुक्त सेवापुरवठादाराकडून संपूर्णपणे आधुनिक व संगणकीकृत सीमा तपासणी नाका उभारण्याची कार्यवाही पुर्ण झाली असून मंगळवार 10 डिसेंबर 2024 पासून कागल येथे सध्या कार्यरत असलेल्या तपासणी नाक्याऐवजी नव्याने स्थापित झालेला व संपूर्ण आधुनिकीकरण, संगणकीकरण झालेला सीमा तपासणी नाका कार्यान्वीत करुन सर्व कामकाज सुरु करण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे. 

 शासन निर्णय दि.25 मार्च 2008, दि.25 जून 2008 व दि.09 ऑगस्ट 2012 अन्वये  राज्यातील परिवहन विभागाच्या 22 सीमा तपासणी नाक्यांचे बांधा, वापरा व हस्तांतरण या तत्वावर आधुनिकीकरण करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आला होता. 

तसेच दि. 27 मार्च 2023 च्या शासन निर्णयाव्दारे राज्यात महाराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 223 (6) (अ) अंतर्गत प्रदान शक्तीचा वापर करुन आधुनिक सीमा तपासणी नाक्यांवर वाहन मालकाकडून, वाहन चालकाकडून विहीत केलेल्या तरतूदीनुसार सेवा कर व उपकर वसूल करण्यास मान्यता देण्यात आली आहे, असेही भोर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes