SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समतेचा महामेरू, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त कागलमध्ये अभिवादनगोकुळ वाचविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून समविचारी आघाडीसोबत एकत्र या : आमदार सतेज पाटील यांची साद शाहू महाराजांच्या विचारांवरच जयसिंगपूर शहराची वाटचाल : आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरशाहू विचारांच्या जतनासाठी स्मारक नव्या रूपात नागरिकांना समर्पितकोल्हापूर जिल्ह्यासाठी आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद कक्ष (ERSU) स्थापन; विशेष वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पणशिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंती उत्साहात डीकेटीईच्या १४ विद्यार्थ्यांची फिन्युलेंट कंपनीत आकर्षक पॅकेजवर निवडसामाजिक न्याय दिनी शाहू महाराजांच्या जयघोषात समता दिंडी उत्साहातराजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून अभिवादनराजर्षी छत्रपती शाहू महाराज : लोकोत्तर राजा

जाहिरात

 

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची दि.११ व १२ ऑगस्ट रोजी संवर्धन प्रक्रिया; कलश व उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था

schedule10 Aug 25 person by visibility 616 categoryराज्य

कोल्हापूर  : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीच्या मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवार दि. ११ व मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी सुरु राहणार आहे. या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन होणार नसल्याने कलश व उत्सव मूर्ती पितळी उंबऱ्याच्या आतमध्ये ठेवून भाविकांना योग्य पद्धतीने दर्शनाची सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

श्री करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी कोल्हापूर तथा प्रशासक देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांचे वतीने मूर्तीची पाहणी करणेकामी वेळोवेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली (भारत सरकार) यांना कळविणेत आले होते. 

त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण नवी दिल्ली यांचे कडून मूर्तीची पाहणी व संवर्धन १६ एप्रिल २०२४ मध्ये करणेत आली होते. त्यावेळेच्या सुचनेनुसार देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने याबाबतचे पत्र दि. १२ जून रोजी महासंचालक भारतीय पुरातत्व विभाग नवी दिल्ली (भारत सरकार) यांना मूर्तीचे नियमित पाहणी व आवश्यक संवर्धन प्रक्रिया करणेबाबत कळवले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग यांचे वतीने श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी व आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे.

त्यामुळे श्री अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ व पासून ते मंगळवार दि. १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत भाविकांना घेता येणार नाही, या कालावधीमध्ये भाविकांना श्रीं ची उत्सवमूर्ती व श्रीकलश दर्शनासाठी ठेवणेत येणार असून, भाविकांनी पितळी उंबऱ्याच्या बाहेरुन श्रीकलश व श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांना सहकार्य करावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes