SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पंचगंगा स्मशानभूमीत 'जादू ग्रुप'तर्फे शेणी दान उपक्रम हातमाग विणकरांसाठी 10 मार्च रोजी सोलापूर येथे हातमाग कापड स्पर्धेचे आयोजनअग्निवीर भरती २०२६ साठी १ एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी सुरूसामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडीलोकशाही दिनी १२२ तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशराजर्षी शाहू मिल येथे आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक : आमदार राजेश क्षीरसागरअथर्व शिंदे, तन्वी पाटील ठरले डी. वाय.पॉलिटेक्निकचे बेस्ट आउटगोइंग स्टुडंट्सस्वर्गीय विनायकराव क्षीरसागर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणादिनी महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस १० हजार शेणी दानशिक्षण, राजकारण, समाजकारण यांना जोडणारा मार्गदर्शक दुवा निखळला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ज्येष्ठ विचारवंत, माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना श्रद्धांजलीहोलिका दहन: असत्यावर सत्याच्या विजयाचा जाज्वल्य उत्सव!

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या दोघांना खेलो इंडियामध्ये कास्यपदक

schedule30 Nov 25 person by visibility 334 categoryक्रीडा

कोल्हापूर  : जयपूर राजस्थान येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे खेळाडू अथर्व गंगाराम पाटील, रणवीर अजितसिंह काटकर यांनी 10 मीटर एअर रायफल या प्रकारात कांस्य पदक पटकावले. 

24 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत जयपूर येथे खेलो इंडिया स्पर्धा संपन्न झाल्या.  यामध्ये 10 मीटर एअर रायफल या प्रकारात सांघिक गटातून अथर्व गंगाराम पाटील, रणवीर अजितसिंह काटकर यांनी दमदार कामगिरी नोंदवत कांस्यपदक जिंकले. 

अथर्व पाटील हा सिव्हिलच्या तृतीय वर्षाचा तर रणवीर काटकर हा आर्किटेक्चर शाखेचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्यांना अधिष्ठाता आणि जिमखाना प्रमुख डॉ. राहुल पाटील, क्रीडा संचालक इजाज गडकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

अथर्व व रणवीरने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज  डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटी, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी  अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes