SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीमहापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेपुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समितीसरळसेवा भरतीसाठी अर्ज करण्यास 26 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढविनापरवाना आरायंत्र व मशिनवर वनविभागाची कारवाई23 नोव्हेंबरला महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाआदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करत निष्पक्ष, पारदर्शक वातावरणात प्रक्रिया राबवा : जिल्हाधिकारी अमोल येडगेधैर्यशील भोसलेची चेन्नई येथील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडबिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू, , मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरणजिल्ह्यात शिदेसेनेला चांगले यश मिळेल : एकनाथ शिंदे; शिंदेसेनेच्या गटप्रमुखांचा कोल्हापुरात मेळावा

जाहिरात

 

राज्यसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी चारधाम यात्रेबद्दल उपस्थित केला मुद्दा, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडून मिळाली सविस्तर माहिती

schedule08 Dec 22 person by visibility 1606 categoryदेश

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातील चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या आरोग्य सुविधेबद्दल तसेच अतिउंचीवर प्रवास करण्यासाठी असलेल्या साधनांच्या सुरक्षेबाबत आणि पायाभूत सुविधांच्या पूूर्ततेबाबत, आज खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला. यात्रेकरूंच्या सुखद आणि सुलभ प्रवासासाठी रोप वे ची सुविधा लवकरच पूर्णत्वास जाईल. तसेच यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरे भरत असल्याचे केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केले.

 चारधाम यात्रेतील चार तीर्थक्षेत्र म्हणजे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्हयातील यमनोत्री आणि गंगोत्री, रूद्रप्रयाग जिल्हयातील केदारनाथ आणि चमोली जिल्हयातील बद्रीनाथ... हजारो भाविक दरवर्षी या ठिकाणी जातात. अतिउंचावर ऑक्सिजनची कमतरता असते. शिवाय हवेचा दाब कमी असतो. अतिनिल किरणांची तीव्रता वाढलेली असते. अशावेळी या चारही तीर्थक्षेत्रावर आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज असल्याकडे खासदार धनंजय महाडिक यांनी लक्ष वेधले. केंद्र सरकारने आरोग्य सुविधा वाढवल्या, तर यात्रेकरूंसह स्थानिक नागरिकांनाही लाभ होईल, असे खासदार महाडिक यांनी राज्यसभेत नमुद केले. त्यावर केंद्रीय पर्यटन मंत्री अजय भट यांनी खुलासा केला.

 दरवर्षी चारधाम यात्रेपूर्वी पर्यटन मंत्रालयाकडून आरोग्य विभागाशी संपर्क साधला जातो. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं सुरू केली जातात. तसेच यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि आरोग्यासाठी चोख व्यवस्था असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान राज्यसभेत बोलताना आज खासदार महाडिक यांनी चारधाम यात्रेला जाणार्‍या भाविकांच्या प्रवास व्यवस्थेविषयी सुध्दा मुद्दा उपस्थित केला. यमनोत्री किंवा केदारनाथला जाण्यासाठी पायी चालत किंवा घोडयावरून अथवा डोलीतून जाण्याचे पर्याय आहेत. मात्र डोली वाहणार्‍या गोरगरीब मजुरांची अवस्था अत्यंत बिकट असते. तर ज्या जनावरांवरून प्रवास केला जातो, त्यांची शारिरीक अवस्था सुध्दा बर्‍याचदा चांगली नसते. या जनावरांना पोटभर खाणेपिणे मिळत नसल्याने, गेल्या वर्षभरात सुमारे ६०० जनावरांचा मृत्यू झालाय. 

अशावेळी केंद्र सरकारकडून केदारनाथ आणि यमनोत्रीसाठी रोप वे सुरू होणार आहे का, आणि होणार असेल तर तो कधी सुरू होईल, याबद्दलची माहिती देण्याची खासदार महाडिक यांनी विनंती केली. त्यालाही पर्यटन मंत्री अजय भट यांनी समर्पक उत्तर दिले. सन २०१३ च्या केदारनाथमधील प्रलयंकारी महापूरानंतर, केंद्र सरकारने झपाटयाने दळणवळणाच्या सुविधा वाढवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कामांवर लक्ष ठेवून असून, चारधाम यात्रेकरूंना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकार पूर्ण क्षमतेने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय केदारनाथ आणि हेमकुंडसाहीब या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी केंद्र सरकारकडून रोप वे ची सुविधा लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यामुळं चारधाम यात्रा अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्‍वास केंद्रीय पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes