+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustअटल सेतूच्या मुख्य भागावर कोणतेही तडे नाहीत adjustयेत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे adjustकाश्मिरमध्ये लवकरच महाराष्ट्र सदन उभारणार : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण adjustनियमित योग साधनेतून वैश्विक ऊर्जा प्राप्त : कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के adjustअन्न प्रक्रिया उद्योगातील नोंदणीकृत वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रशिक्षण adjustसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये 'आंतरराष्ट्रीय योग दिवस' उत्साहात adjustकोल्हापूर महानगरपालिका : 6 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही नागरी सुविधा केंद्रे सुरु adjustशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी राजर्षि छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सवानिमित्त के.एम.टी. उपक्रमामार्फत "ऐतिहासिक वास्तू दर्शन" सहलीसाठी विशेष बससेवा adjustचप्पल लाईन येथील विद्युत सेवावाहिनी शिफ्टिंगचे काम सुरु; 'आप'च्या मध्यस्तीस यश adjustशिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री जाधव; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली सूचना
SMP_news_Gokul_ghee
schedule11 Jun 24 person by visibility 264 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : डीकेटीईच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी प्राजक्ता चौगुले, हर्षदा कवाळे, अंकिता देसाई व यश टाळे यांनी डॉ व्ही.डी. शिंदे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापनासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापन मध्ये काम करीत असणा-यांच्यावरील कामाचा ताण लक्षात घेवून तो कामाचा ताण कमी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानावर आधारीत ‘डिझाईंन ऍण्ड डेव्हलपमेंट ऑफ ड्रोन फॉर रेस्न्यु सरव्हिएलन्स अँण्ड डिझास्टर मॅनेजमेंट‘ हा नाविन्यपूर्ण प्रकल्प डीकेटीईच्या आयडिया लॅबमध्ये बनविला आहे.

ज्या ज्या वेळी आपत्ती येते भूस्खलन होते, तेंव्हा भूस्खलनच्या खाली अडकलेल्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले जातात यापूर्वी माळीणगांव किंवा उरसलवाडी येथे अशा घटना घडलेल्या आहेत त्यावेळी गाडलेले जीव ओळखणे अवघड जाते. अशावेळी भूस्खलनच्या ठिकाणी थर्मल इमेजिंग सिस्टीममुळे सुस्सज असलेले ड्रोन अडकलेल्या जीवांना वाचविण्यासाठी एक वरदान ठरु शकते परंतू अनेकदा हे ड्रोन तंत्रज्ञान विकसीत असूनही पाठविण्यास वेळ लागत असलेने बचाव कार्यात विलंब होतो सहज उपलब्ध होत नाही या समस्येचा विचार करुन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी एसएआर ड्रोन सिस्टीमची विकसीत केला आहे. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांनी भूस्खलन आणि पूर निगराणी यासरख्या आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी ड्रोन त्वरीत तैनात करुण आपत्ती प्रतिसाद सुधारणे तसेच मर्यादित मानवी प्रवेशयोग्यता असलेल्या गंभीर ठिकाणी पोहचणे हा उददेश आहे. 

तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये अगीच्या ठिकाणी पोहचण्यास विलंब होत असतो जसे की लहान ते मध्यम स्तरावरील आग आणि कमी उंचीच्या इमारतीमध्ये मनुष्यबळ पोहचत नाही अशा वेळी या ड्रोनचा वापर केला जावू शकतो.

डीकेटीईत बनविलेल्या या प्रकल्पामध्ये ड्रोन व त्याला जोडलेल्या थर्मल कॅमेराचा पुरेपुर उपयोग करुन घेतला आहे यामुळे आपत्ती व्यवस्थापनमधील सुस्पष्ट छायाचित्रे कॉम्प्युटरवर वायरलेस प्रणालीव्दारे पाठवता येते. आपत्ती व्यवस्थापनाने फक्त एका जागी थांबून ड्रोन कंन्ट्रोल करुन सध्य परिस्थिती पाहता येते व त्या परिस्थतीवर नियंत्रण मिळवता येते. तसेच अगीच्या ठिकाणी आग विजविण्यास या ड्रोनचा वापर केला जावू शकतो यामुळे मनुष्यबळ व वेळेची बचतही होते तसेच संभाव्य धोकाही टाळता येतो. सदर प्रकल्पास विद्यार्थ्यांना टोटल टेक सर्व्हेअर चे अभिजीत चव्हाण यांचेकडून प्रायोजकत्व मिळाले आहे तसेच या प्रकल्पास टाटा टेक्नॉलॉजीज आणि सेंटर ऑफ एक्सलन्स गोकुळ शिरगांव मॅन्युफॅक्चरस असोसिएशद्वारे संशोधन आणि विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे.

डीकेटीईचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण व समाजउपयोगी प्रकल्प विकसीत करीत असतात या नाविन्यपूर्ण प्रकल्पाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ.व्ही.आर.नाईक यांचे सहकार्य लाभले.