पुण्यातील गुंडाचा सोलापुरात इन्काउंटर
schedule15 Jun 25 person by visibility 208 categoryगुन्हे

पुणे : पुणे क्राइम ब्रांच आणि मोहोळ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सराईत गुन्हेगार शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (रा. सय्यद नगर, हडपसर, पुणे) एन्काऊंटर झाला.
मोहोळ तालुक्यातील लांबोटी (पुणे) येथे शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली त्याच्यावर १५ गंभीर गुन्हे दाखल होते. कारवाई झालेला शेख फरार होता.
पुणे क्राइम ब्रांचला शेख लांबोटी येथे नातेवाइकांकडे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रात्री पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच शेखने पिस्तूलातून गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शेख जागीच ठार झाला. या घटनेची चौकशी सुरू आहे.